काटेवाडी : परिसरात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी बारा नंतर संततधार सुरू झाली आहे. बुधवारी दुपारी बाराच्या दरम्यान काटेवाडी, पिंपळी लिमटेक, ढेकळवाडी, कन्हेरी, खताळपट्टा, मासाळवाडी परिसरात पावसाला सुरुवात झाली. मागील पंधरा दिवसांपासून पाऊस बंद झाला होता; मात्र रिमझिम पाऊस सुरू झाल्याने शालेय विद्यार्थी, दुचाकी वाहनधारकांची तारांबळ उडाली. मधूनच पावसाच्या जोरदार धारा येत होत्या. दुचाकी वाहनधारक आडोशाला उभे राहिलेचे चित्र पाहावयास मिळत होते. अचानक पावसाने सुरुवात केल्याने घराबाहेर पडलेले नागरिक, वाहनचालकांनी एसटी स्टँडमध्ये आसरा घेतला. या पावसाने नुकतीच केलेली ऊसलागवड मका, सोयाबीन, कडवळ आदी चारा पिकांसाठी उपयुक्त ठरला आहे. ‘छत्रपती’च्या कार्यक्षेत्रात या पावसाने ऊसलागवडीसाठी मदत होणार आहे.
काटेवाडी परिसरात संततधार
By admin | Updated: July 21, 2016 01:16 IST