शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
3
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
4
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
5
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
6
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
7
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
8
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
9
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
10
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
11
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
12
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
13
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
14
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
15
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
16
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
17
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
18
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
19
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
20
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!

साताऱ्यात जनक्षोभ!

By admin | Updated: July 30, 2016 04:01 IST

कोरेगाव तालुक्यातील एका गावात पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली. या प्रकरणी संतोष

वाठार स्टेशन (जि. सातारा) : कोरेगाव तालुक्यातील एका गावात पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली. या प्रकरणी संतोष आबासाहेब भोईटे (वय ४६) याला वाठार स्टेशन पोलिसांनी तत्काळ अटक केली. मात्र, या वेळी पोलीस ठाण्यासमोर संतप्त जमावातील एकाने आरोपीच्या अंगावर पेट्रोल टाकण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच अटकाव केल्याने अनर्थ टळला. भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. घटनास्थळ आणि पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पीडित बालिकेचे आई-वडील, आजी पंचक्रोशीत मोलमजुरी करतात. मुलीचे आई-वडील गुरुवारी पहाटे वाई तालुक्यातील एका गावात मजुरीसाठी गेले होते. आजी गावातीलच शेतात भांगलणीसाठी गेली होती. तिच्याबरोबर ती चिमुरडीही होती. काम संपल्यानंतर सायंकाळी ५ वाजता शेतमालकाने स्वत:ची मुलगी अन् पीडित मुलीला मोटारसायकलवरून गावात आणले. तिला घरी सोडून ते निघून गेले. दरम्यान, संतोष भोईटे त्याच्या शेताकडे चालत निघाला होता. त्याने आजीची वाट पाहत असलेल्या मुलीला बोलावून हातात १० रुपये देत ‘चल, तुला चॉकलेट देतो,’ असे सांगितले. तिला घराच्या पाठीमागे असलेल्या छपरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तो निघून गेला. वेदना असह्य झाल्याने संबंधित मुलगी रडत रस्त्याकडे आली आणि आजीची वाट पाहत रडू लागली. आई आणि आजी घरात आल्यानंतर त्यांना तिने झालेला प्रकार सांगितला. आई-आजीने तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता वैद्यकीय अधिकारी व ग्रामस्थांनी सहायक पोलीस निरीक्षक शहाजी निकम यांना हा प्रकार सांगितला. त्यांनी तातडीने दवाखान्यात धाव घेतली. प्राथमिक उपचार करून तिला जिल्हा रुग्णालयात हलविले. संबंधित बालिकेने दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी संतोष भोईटे याला त्याच्या घरातून ताब्यात घेतले. (वार्ताहर)जमावाची पोलीस ठाण्यावर ‘चाल’!चिमुकलीवर अत्याचार झाल्याची माहिती मिळताच शुक्रवारी सकाळपासून विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, ग्रामस्थांनी वाठार पोलीस ठाण्यावर चाल केली. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून दंगा नियंत्रण पथकाला पोलिसांनी पाचारण केले होते. मात्र, आरोपीला न्यायालयात नेताना त्याच्यावर जमावाने पेट्रोल ओतण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच अटकाव करून जमावाला पांगविले. दरम्यान, भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. अत्याचारानंतर आरोपी आरतीमध्ये दंग!भयानक कृत्य करूनही संतोष भोईटे यांच्यावर कसलाही परिणाम झालेला नव्हता. अत्याचार केल्यानंतर गावातील एका मंदिरात आरतीला तो उपस्थित होता. त्यानंतर गावातही फिरला. रात्री ८ वाजता घरी जाऊन काही न घडल्याच्या अविर्भावात तो जेवत होता. त्याचवेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.