शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी समितीसाठी सातमकर अस्थायी

By admin | Updated: March 11, 2017 04:19 IST

भाजपाबरोबरील लढाईत विजय पक्का करण्यासाठी शिवसेनेने वजनदार माजी नगरसेवकांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. मात्र निवडून आलेले हेच दिग्गज नगरसेवक शिवसेनेसाठी

मुंबई : भाजपाबरोबरील लढाईत विजय पक्का करण्यासाठी शिवसेनेने वजनदार माजी नगरसेवकांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. मात्र निवडून आलेले हेच दिग्गज नगरसेवक शिवसेनेसाठी डोईजड होत आहेत. त्यात भाजपाने हक्क सोडल्यामुळे हे बडे नगरसेवक मोठ्या पदांवरच दावा करीत असल्याने नाराज कोणाला करणार? असा पेच शिवसेनेपुढे निर्माण झाला आहे. याची प्रचिती स्थायी समिती अध्यक्षपदाचा अर्ज भरण्यावरून उडालेल्या गोंधळातून उघड झाली. महापालिकेची आर्थिक नाडी हाती असलेल्या स्थायी समिती अध्यक्षपदावरून शिवसेनेतील बड्या नगरसेवकांमध्ये चुरस होती. मंगेश सातमकर यांचे नाव जवळपास निश्चितच झाले होते. मात्र ऐनवेळी ‘मातोश्री’वरून फोन खणखणला आणि आत्तापर्यंत डावलले गेलेले ज्येष्ठ नगरसेवक रमेश कोरगावकर यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली. यामुळे सातमकर नाराज होऊन महापालिकेतून निघून गेले.स्थायी समिती अध्यक्षपदाच्या शर्यतीत रमेश कोरगावकर, मंगेश सातमकर आणि आशिष चेंबूरकर यांची नावे होती. यापैकी सायन कोळीवाडा येथील विभागप्रमुख असलेले माजी नगरसेवक हे प्रमुख दावेदार मानले जात होते. महापौर, सभागृह नेता, स्थायी समिती अध्यक्षपद यापैकी महत्त्वाचे कोणतेही पद मिळाले नसल्याने सातमकर यांचा भ्रमनिरास झाला. त्यामुळे कोरगावकर अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरत असताना कोणालाही न सांगता सातमकर रागारागाने महापालिका मुख्यालयातून निघून गेले. असा वाद शिक्षण समिती अध्यक्षपदावरूनही झाला आहे. शिक्षण समिती अध्यक्ष पदासाठी शीतल म्हात्रे या इच्छुक होत्या. त्यांचाही पत्ता कट करत शुभदा गुडेकर यांना या पदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे. स्थायी व शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी शिवसेना वगळता कोणत्याही पक्षाने अर्ज भरला नसल्याने कोरगावकर व गुडेकर यांची बिनविरोध नेमणूक होणार आहे. (प्रतिनिधी)असा झाला पत्ता कटमहापौर, सभागृह नेता या महत्त्वाच्या पदांवर मंगेश सातमकर यांची वर्णी लागली नाही. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्षपद त्यांच्यासाठीच राखीव असल्याचे बोलले जात होते. खुद्द सातमकर यांनाही आपलेच नाव जाहीर होण्याची खात्री होती. त्यानुसार उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीनेच सातमकर महापालिका मुख्यालयात आले होते. सकाळपासून त्यांनी पालिका मुख्यालयातील पक्ष कार्यालयात ठाण मांडले होते. परंतु मातोश्रीवरून निघालेल्या फर्मानात सातमकर यांचा पत्ता कट होऊन भांडुप येथून सलग चारवेळा निवडून आलेले रमेश कोरगावकर यांना उमेदवारी देण्यात आली.