शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

सतिश शेट्टी हत्या प्रकरण - आंधळकर, कवठाळे यांचा जामीन फेटाळला

By admin | Updated: June 20, 2016 21:47 IST

माहिती अधिकार कार्यकर्ते सतिश शेट्टी यांच्या हत्ये प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) तत्कालीन पोलिस निरीक्षक भाऊसाहेब आंधाळकर व सहायक

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. २० - माहिती अधिकार कार्यकर्ते सतिश शेट्टी यांच्या हत्ये प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) तत्कालीन पोलिस निरीक्षक भाऊसाहेब आंधाळकर व सहायक पोलिस निरीक्षक नामदेव कवठाळे यांचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश विकास कुलकर्णी यांनी सोमवारी फेटाळून लावला. आरोपींना जामीन दिल्यास ते माजी पोलीस अधिकारी व तपास अधिकारी असल्याने पुराव्यात हस्तक्षेप करु शकतात, त्यामुळे त्यांचा जामीन अर्ज फेटाळत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे़ माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांची १३ जानेवारी २०१० रोजी तळेगाव दाभाडे येथेहत्या करण्यात आली होती. त्यावेळी गुन्ह्याचा तपास आंधळकर यांच्याकडे होता. ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी काही जणांना अटक केली होती़ सतीश शेट्टी यांच्या भावाने तपास योग्य दिशेने होत नसून संशयितांकडे तपास होत नसल्याचा आरोप केला होता़ त्यानंतर गुन्ह्याचा तपास योग्य रितीने झाला नसल्याने हा तपास सीबीआयकडे देण्यात आला होता. केंद्रिय गुन्हे अन्वेषण विभागाने दोघांना पुराव्यांशी छेडछाड केल्याप्रकरणी अटक केली होती. सुरवातीला पोलिस कोठडी आणि नंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर दोघांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. आंधळकर आणि कवठाळे यांच्या वतीने अ‍ॅड. सुधीर शहा यांनी दोघांना जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता. याप्रकरणी कागदपत्रांशी छेडछाड झालेल्याचे सीबीआयच्या लक्षात आल्यानंतर आंधळकर आणि कवठाळे यांना या प्रकरणी अटक करण्यात आली होती. सीबीआयच्या सरकारी वकीलांनी दोघांचा जामीन फेटाळण्याची मागणी केल्यानंतर न्यायालयाने दोघांचा जामीन फेटाळला.