शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीत हळदीची समाधानकारक आवक

By admin | Updated: October 23, 2016 15:24 IST

संपूर्ण देशात हळद आणि बेदाण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या येथील बाजार समितीत हळदीची समाधानकारक आवक होत आहे.

ऑनलाइन लोकमत

​सांगली, दि. 23 - संपूर्ण देशात हळद आणि बेदाण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या येथील बाजार समितीत हळदीची समाधानकारक आवक होत आहे. बेदाण्याला मागणी असलीतरी बाजार समितीत सौद्यासाठी येणाऱ्या बेदाण्याच्या आवकेत मात्र घट झाली आहे. सध्या हळदीला प्रतीक्वींटल ६८५० ते ८५३० रूपये असा दर मिळत आहे. तर बेदाण्यात हिरवा बेदाण्याला ९० ते १२० रूपये प्रतीकिलो तर काळा बेदाण्याला ४० ते ६० रूपये प्रतीकिलो दर मिळत आहे. हळद आणि बेदाण्यासाठी सांगलीची बाजारपेठ संपूर्ण देशात प्रसिध्द आहे. सांगली बाजारपेठेत मिळणारा चांगला व दर्जेदार माल तसेच दरही योग्य असल्याने देशभरातून व्यापारी खरेदीसाठी सांगलीत येतात. सध्या हळद व बेदाणा दोन्हींचा हंगाम नसलातरी वर्षभर आवक सुरूच असते. हळदीचा हंगाम प्रामुख्याने जानेवारी ते एप्रिल तर बेदाण्याचा हंगाम फेब्रुवारी ते एप्रिलअखेर असतो. मात्र, दिवाळीला बेदाण्याची वाढणारी मागणी लक्षात घेऊन व्यापारी गणेशोत्सवाच्या दरम्यान सांगलीत येऊन माल खरेदी करत असतात. विशेषत: उत्तर भारतातील व्यापारी या कालावधीत येऊन बेदाणा खरेदी असतात. या आठवड्यातील बाजार समितीचा आढावा घेतला असता राजापूरी हळदीची १३२७ क्वींटल आवक झाली असून गेल्या आठवड्यापेक्षा १७७२ क्वींटलने ही आवक जास्त आहे. राजापूरी हळदीला सध्या किमान दर ७ हजार ते कमाल ८ हजार ५३० रूपयांपर्यंत मिळत आहे. परपेठ हळदीची या आठवड्यात ७७९ क्विंटल आवक झाली असून ही आवक गेल्या आठवड्यापेक्षा १३३ क्वींटलने कमी आहे. सध्या किमान दर ६ हजार ८५० तर कमाल दर ७ हजार ९०० रूपयांपर्यंत मिळत आहे. राजापूरी हळदीला प्रती क्वींटल सरासरी दर ७ हजार ६०० तर परपेठ हळदीला ७ हजार ५५० रूपये दर मिळत आहे. बेदाण्याची सांगली बाजार समितीबरोबरच तासगाव बाजार समितीत चांगली आवक होत असते. सांगलीत आठवड्यात दोन दिवस तर तासगावला तीन दिवस सौदे निघत असतात. या आठवड्यात सरासरी २०० गाड्या बेदाण्याची आवक झाली असून यात हिरव्या बेदाण्याला प्रती किलोचा दर ९० ते १२० रूपये तर काळ्या बेदाण्याला ४० ते ६० रूपये दर मिळत आहे. बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना सध्यातरी खर्चाच्या प्रमाणात दर मिळत नसल्याचे चित्र आहे.