शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

सातारा हिल हाफ मॅरेथॉन ‘गिनिज’मध्ये

By admin | Updated: September 6, 2015 23:21 IST

पाच हजार स्पर्धक : एकाच डोंगरावर सर्वाधिक लोक धावले

सातारा : साताऱ्याच्या पश्चिमेला असलेल्या यवतेश्वरच्या डोंगरावर हजारो पावले धावली अन् एक नवीन रेकॉर्ड स्थापन केले. रविवारी आयोजित सातारा हिल हाफ मॅरेथॉनची गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये निवड झाली आहे. ‘डोंगरावरील धावण्यात सर्वाधिक लोक-एक डोंगर’ यासाठी ही नोंद केली आहे. गिनिजचे प्रतिनिधी ग्लेन पोलार्ड यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान झाले. स्पर्धेचे हे चौथे वर्ष आहे. सातारा पोलीस कवायत मैदान ते यवतेश्वर पठार व पुन्हा पोलीस कवायत मैदान या २१ किलोमीटर अंतराच्या सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे रविवारी आयोजन केले होते. यामध्ये पाच हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. पहाटे सहा वाजता पोलीस कवायत मैदानावरून स्पर्धेस प्रारंभ झाला. स्पर्धेत आंतरराष्ट्रीय धावपटूंसह दहा वर्षांपासून ते ९६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकानेही सहभाग घेतला होता.या स्पर्धेत इथिओपिया देशातील खेळाडूंनी विजेतेपद मिळविले. यामध्ये बिर्क जिटर, टॅमरट गुडेटा आणि गुडिसा डेबेले विजेते ठरले. त्यांना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, सुभाषिश आचार्य, डॉ. चंद्रशेखर घोरपडे यांच्या हस्ते रोख बक्षिसे व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. स्पर्धा पूर्ण केल्यानंतर गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी ग्लेन पोलार्ड यांच्या हस्ते मॅरेथॉन संयोजन समितीला प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. (प्रतिनिधी) (आणखी वृत्त हॅलो १ वर)गुजरात स्पर्धेला सोडले मागेसातारा हिल हाफ मॅरेथॉनने गुजरातमधील स्पर्धेला मागे टाकले. गुजरातमध्ये गेल्यावर्षी झालेल्या स्पर्धेत २,१२२ स्पर्धक सहभागी झाले होते, तर सातारा येथील स्पर्धेत तब्बल पाच हजार स्पर्धक सहभागी झाले होते. त्यामुळे याची गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डने नोंद घेतली. सातारा येथील हिल मॅरेथॉन ही अवघड होती, अशा शब्दात ‘गिनिज’ने या स्पर्धेचे कौतुक केले आहे.