शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

Satara Bus Accident: मदतकार्यात माणसांतच दिसला देव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 02:36 IST

शनिवारी पोलादपूर-महाबळेश्वर दरम्यानच्या आंबेनळी घाटात कोकण कृषी विद्यापीठाची बस दरीत कोसळून ३० जणांच्या मृत्यूअंती या घाटाचे काही काळ मृत्यूच्या घाटात रूपांतर झाले

- जयंत धुळपअलिबाग : शनिवारी पोलादपूर-महाबळेश्वर दरम्यानच्या आंबेनळी घाटात कोकण कृषी विद्यापीठाची बस दरीत कोसळून ३० जणांच्या मृत्यूअंती या घाटाचे काही काळ मृत्यूच्या घाटात रूपांतर झाले; परंतु त्याच क्षणाला ट्रेकर्सच्या जीवाची बाजी आणि परिसरातील ग्रामस्थांच्या माणूसकीच्या महापुरासच प्रारंभ झाला आणि तब्बल २९ तासांच्या रेस्क्यू आॅपरेशन दरम्यान माणसामधल्या देवाची अनुभूती उपस्थितांना आली.बस दरीत कोसळल्याची बातमी जवळच्या वाडा, कुंभरोशी, चिरेखिंड या गावांत पोहोचली. त्यानंतर तत्काळ या गावातील ग्रामस्थांनी प्रथम या पावसात ६०० फूट खोल दरीत उतरून २२ जण मृत झाल्याची माहिती वर आणली आणि आपल्या स्तरावर मदतकार्यास प्रारंभ केला. त्याच सुमारास पोलादपूरचेपोलीस निरीक्षक प्रकाश पवार आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले आणि शासकीयसर्व यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली.सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास महाबळेश्वर ट्रेकर्स, सह्याद्री ट्रेकर्सच्या धाडसी शिलेदारांनी मृतदेह दरीतून वर काढण्यास दोरांच्या साहाय्याने प्रारंभ केला. त्यांच्या या आपत्ती निवारण कामात सहकार्य करण्यासाठी पोलादपूर, महाड, खेड, दापोली, कोलाड, भोर, पुणे आणि ठाणे येथील विविध ट्रेकिंग व अ‍ॅडव्हेंचर ग्रुपचे ट्रेकर्स आपल्या रोप, हारनेस, झुमार, कॅरॅबीनर्स अशा गिर्यारोहण साहित्यासह दाखल झाले. घटनास्थळी जमलेल्या ७५पेक्षा अधिक ट्रेकर्सचा हेतू एकच होता, आपल्याला बचाव कार्य करायचे आहे. परिणामी, क्षणाचाही विलंब न लावता या सर्वट्रेकर्सचे संघटित काम तत्काळ सुरू झाले आणि मृतदेह दरीतून वर आणण्याच्या कामास मोठी गती आली.आरोग्य यंत्रणेचा समन्वयआरोग्य यंत्रणेचा अंतर्भाव या समन्वयात अत्यंत काळजीपूर्वक करण्यात आल्याचे दिसून आले, त्यामुळे मृतदेह दरीतून वर आणल्यावर तो पोलादपूर रुग्णालयात आणून तेथे पोस्टर्माटम आणि पुढे तो मृतदेह मृताच्या गावी त्यांच्या घरी पाठविण्याकरिता तत्काळ व्यवस्था, यामुळे सरकारी यंत्रणा आणि नातेवाईक यांचा सर्वत्र दिसून येणार संघर्ष येथे कुठेही पाहायला मिळाला नाही.दापोली दुसºया दिवशीही सुन्नकोकण कृषि विद्यापीठाच्या ३० कर्मचाºयांना शोकाकूल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. दापोली दुसºया दिवशीही सुन्न होती. सर्व व्यवहार बंद ठेवून मृतांना श्रध्दांजली वाहण्यात आली.२५ जणांवर दापोलीत, संगमेश्वर, सातारा, मंडणगड येथे प्रत्येकी एकावर तर दोघांवर सिंधुदुर्गात अंत्यसंस्कार करण्यात आले. पालकमंत्री रविंद्र्र वायकर, आमदार संजय कदम, कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य, शिक्षण संचालक डॉ. सतिश नारखेडे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.देसाई यांनामानसिक धक्काबस दरीत कोसळत असताना प्रकाश सावंत-देसाई गाडीतून बाहेर फेकले गेले. ते सुदैवाने बचावले. त्यांच्यामुळेच हा अपघात झाल्याचे सर्वांना समजले. ते दरीतून रस्त्यावर आले. त्यांनी अपघाताचे वृत्त दापोली कृषी विद्यापीठात कळवले तसेच घाटातून प्रवास करणाºयांनाही सांगितले. त्यांच्यामुळेच शोधकार्य तत्काळ सुरू करता आले. त्यांना मोठा मानसिक धक्का बसल्याचे स्पष्टपणे जाणवत होते.मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीअपघातात मृत्युमुखी पडलेले विक्रांत शिंदे रा. गिणवणे, सचिन गिम्हवणेकर, नीलेश तांबे, संतोष झगडे, राजेंद्र रिसबूड, संजीव झगडे, प्रशांत भांबेड, रत्नाकर पागडे, सचिन झगडे, प्रमोद शिगवण, सुनील कदम, राजाराम गावडे, प्रमोद जाधव, पंकज कदम, रितेश जाधव, विनायक सावंत, संदीप सुवरे, सुनील साठले, राजेंद्र बंडबे, सुयश बाळ, संदीप झगडे, सचिन गुजर, रोशन तबीब, दत्तात्रेय धायगुडे, हेमंत सुर्वे, किशोर चौगुले, संदीप भोसले, संतोष जालगावकर, राजेश सावंत, जयवंत चौगले हे एकूण ३० मृतदेह बाहेर काढले आहेत.शिवसेनेतर्फे प्रत्येकी १ लाखाची मदतकेंद्र्रीय अवजड मंत्री अनंत गीते यांनी कोकण कृषी विद्यापीठ प्रशासनाची आढावा बैठक घेऊन कुटुंबीयांना दिलासा देण्याच्या सूचना दिल्या. मृतांच्या कुटुंबीयांना शिवसेनेतर्फे प्रत्येकी १ लाख रुपये मदत देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.घाट रस्त्यांनाबॅरिकेटस् आवश्यकसगळ्या घाटांना बॅरिकेटस् लावणे आवश्यक आहे. त्याचीही दखल घेतली जाणार असल्याचे वायकर यांनी सांगितले.अपघातात मृत्यू ओढवलेल्या कुटुंबीयांना वैयक्तिकरीत्या प्रत्येकी १० हजारांची मदत दिली असल्याचे वायकर यांनी सांगितले.जैन मंडळाकडून भोजनदापोली येथील जैन मंडळाचे काही कार्यकर्ते रविवारी सकाळी घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या वतीने मदतकार्य करणाºयांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली. सुमारे ५०० नागरिकांना मंडळाकडून चहा, नाष्टा, जेवणाची व्यवस्था करण्यात आली. मंडळात चेतन जैन, हसमुख जैन, महेश जैन, प्रवीण जैन, राजू जैन, योगेश जैन व शाम जैन यांचा समावेश होता.त्या महिलेत दिसला देव...एक अत्यंत हृदय हेलावून टाकणारा आणि माणूसकीचा गहिवर सिद्ध करणारा प्रसंग येथे कार्यरत पोलादपूरचे पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांनी सांगितला. शनिवार आणि रविवार या दोन दिवस सुरू असलेल्या रेस्क्यू आॅपरेशनदरम्यान एक सर्वसामान्य महिला घरी बनवलेले वडापाव आणून येथे काम करणारे ट्रेकर्स आणि अन्य सहकारी यांना खाऊ घालत होती. इतकेच नव्हे, तर दरीत जर महिला असेल तर खाली उतरण्याचीही तयारी तिने दर्शवल्याचे पवार यांनी सांगितले.रायगड जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी आणि रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी समन्वयातून केलेले आपत्ती निवारणाचे नियोजन प्रत्यक्ष काम करणाºयांकरिता आत्यंतिक महत्त्वाचे ठरले. बचाव कार्यातील ट्रेकर्सना जी काही मदत अपेक्षित असायची ती त्यांच्याकडून जाणून ती पूर्ण करण्याकरिता रायगडचे अप्पर जिल्हाधिकारी डॉ. भारत शितोळे आणि अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील हे दोन वरिष्ठ अधिकारी या २९ तासांच्या बचाव मोहीम काळात तत्परतेने कार्यरत होते.रविवारी दुपारी ४ वाजता तब्बल २९ तासांनी हे रेस्क्यू आॅपरेशन पूर्ण झाले. सर्व ट्रेकर्स दरीतून वर आले, त्यांना सर्वांनी धन्यवाद दिले. सतत चिखलात काम केल्याने या ट्रेकर्सच्या पायांच्या तळव्यांना पडलेल्या चिरा आणि काहींच्या पायातून येणारे रक्त पाहिल्यावर मानव सेवा यापेक्षा आणखी काय असू शकते, याचे प्रत्यंतर सर्वांना आले.

टॅग्स :Satara Bus Accidentसातारा बस अपघात