शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पोळ्यावर बहिष्कार टाकत सरपंचाची प्रतीकात्मक अंत्ययात्रा

By admin | Updated: September 1, 2016 19:29 IST

गुरूवारी पोळा सणावर बहिष्कार टाकून सरपंच बळीराम आजबे यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली.

ऑनलाइन लोकमतबीड, दि. 1 - वडवणी तालुक्यातील चिंचाळा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या नागरगोजे वस्तीवरील रहिवाशांनी गुरूवारी पोळा सणावर बहिष्कार टाकून सरपंच बळीराम आजबे यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. रस्ता प्रश्नी ग्रा. पं. दुर्लक्ष करीत असल्याचा रहिवाशांचा आरोप आहे.नागरगोजे वस्तीवर ४० ते ४५ कुटुंबे मागील ४० वर्षांपासून वास्तव्यास आहेत. या वस्तीवर अद्याप कुठल्याही मूलभूत सुविधा पोहचलेल्या नाहीत. गावापासून पाच किमी अंतरावर असलेल्या या वस्तीवर जाण्यासाठी रहिवाशांनी वर्गणी गोळा करून गतवर्षी कच्चा रस्ता तयार केला होता. मात्र, खापरवाडी येथील ग्रामस्थांसोबत दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादामुळे या रस्त्यावरून जाण्यास त्यांनी प्रतिबंध केल्याचा आरोप नागरगोजे वस्तीवरील रहिवाशांनी केला.

गुरूवारी पोळा सणाची लगबग सुरू असताना नागरगोजे वस्तीवर मात्र सण साजरा केला नाही. वस्तीवर जाण्यासाठी रस्ताच नसल्याने दळणवळणात अडचणी येत आहेत. रस्ता प्रश्न मार्गी लावण्यास ग्रामपंचायत असमर्थ ठरत असल्याचा आरोप करून, रहिवाशांनी सरपंचांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून निषेध नोंदवला. यावेळी दत्ता नागरगोजे, नामदेव नागरगोजे, पार्वती नागरगोजे, सागरबाई नागरगोजे, रामकिसन नागरगोजे, बाजीराव नागरगोजे, दिलीप नागरगोजे, देवईबाई नागरगोजे, सौमित्रा नागरगोजे यांच्यासह अबालवृध्द उपस्थित होते.