शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचासह अधिकारी अडचणीत

By admin | Updated: August 15, 2016 03:49 IST

तालुक्यातील खंडाळे ग्रामपंचायतीने माहितीच्या अधिकारात दिलेल्या माहितीमध्ये तफावत असल्याचे उघड झाले आहे.

अलिबाग : तालुक्यातील खंडाळे ग्रामपंचायतीने माहितीच्या अधिकारात दिलेल्या माहितीमध्ये तफावत असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रभारी मुख्यकार्यकारी अधिकारी अविनाश गोटे यांनी पोलिसांकडे फिर्याद दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकारी आणि पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे.खंडाळे ग्रामपंचायतीने अरुण गोंधळी यांना माहितीच्या अधिकारामध्ये २१ आॅक्टोबर २०१५ रोजी खंडाळे ग्रामपंचायतीच्या ३० मे २०१५ च्या मासिक सभेचे इतिवृत्त दिले होते. खंडाळे ग्रामपंचायत इतर माहिती देत नाही म्हणून गोंधळी यांनी अलिबाग पंचायत समितीचे विस्तार अधिकारी राठोड यांच्याकडे अपील केले होते. या अपिलाची सुनावणी दोनच दिवसांपूर्वी पंचायत समितीकडे झाली. त्यावेळी विद्यमान ग्रामसेविका बेलोसकर व तत्कालीन ग्रामसेवक प्रवीण पाटील हे उपस्थित होते. यावेळी गोंधळी यांना खंडाळे ग्रामपंचायतीच्या ३० मे २०१५ च्या मासिक सभेच्या इतिवृत्ताची प्रत पुन्हा देण्यात आली. ती प्रत पाहून गोंधळी हे चक्र ावूनच गेले. गोंधळी यांना पूर्वी माहिती अधिकारात दिलेल्या इतिवृत्तामध्ये रूळे कोळोशी येथे ८३ हजार ३९४ इतक्या रकमेचे जळीत ओटा बांधणे या कामाचा उल्लेख केलेला नव्हता. तो या इतिवृत्तामध्ये दिसून येत होता. राज्य शासनाचा व केंद्र शासनाचा निधी हडप करणे हाच एकमेव उद्देश असल्याचे तक्र ारदार अरु ण गोंधळी व सुरेश खंडागळे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश गोटे यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले. गोटे यांनी याची गंभीर दखल घेवून जि.प.च्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) यांना प्रकरणात तत्काळ पोलिसांकडे फिर्याद दाखल करण्याचे लेखी आदेश निवेदनावर दिले. (प्रतिनिधी)>विस्तार अधिकाऱ्यांकडे के ले अपीलखंडाळे ग्रामपंचायतीने अरुण गोंधळी यांना माहितीच्या अधिकारामध्ये २१ आॅक्टोबर २०१५ रोजी खंडाळे ग्रामपंचायतीच्या ३० मे २०१५ च्या मासिक सभेचे इतिवृत्त दिले होते. खंडाळे ग्रामपंचायत इतर माहिती देत नाही म्हणून गोंधळी यांनी अलिबाग पंचायत समितीचे विस्तार अधिकारी राठोड यांच्याकडे अपील केले होते.गोंधळी यांना खंडाळे ग्रामपंचायतीच्या ३० मे २०१५ च्या मासिक सभेच्या इतिवृत्ताची प्रत पुन्हा दिली. यामध्ये गोंधळी यांना पूर्वी माहिती अधिकारात दिलेल्या इतिवृत्तामध्ये रूळे कोळोशी येथे ८३ हजार ३९४ इतक्या रकमेचे जळीत ओटा बांधणे या कामाचा उल्लेख केलेला नव्हता.