शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

भिवंडीतील रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी खारबावच्या सरपंचाचे टोल नाक्यावर उपोषण आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2021 13:03 IST

भिवंडीतील मानकोली अंजुरफाटा ते चिंचोटी महामार्गाची सध्या प्रचंड दुरावस्था झाली आहे.

नितिन पंडीत 

भिवंडी:भिवंडीतील मानकोली अंजुरफाटा ते चिंचोटी महामार्गाची सध्या प्रचंड दुरावस्था झाली आहे . त्यामुळे हा रस्ता आता मृत्यूचा सापळा बनला आहे.  मागील अनेक वर्षांपासून या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना आपला जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे या रस्त्याची जबाबदारी असलेल्या सुप्रीम कंपनीबरोबरच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांचे या रस्त्यावर पुरता दुर्लक्ष होत आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठं मोठे खड्डे पडले असून रस्ता प्रचंड नादुरुस्त झाला आहे. 

मात्र या रस्त्यावर सुप्रीम कंपनीमार्फत मालोडी येथील टोल नाका राजरोसपणे सुरु आहे. सार्वजनिक बांधकाम विभागासह शासनाचे या रस्त्याच्या दुरावस्थेकडे लक्ष जावे व हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त व्हावा या मागणीसाठी खारबाव ग्राम पंचायतीचे सरपंच महेंद्र पाटील हे गुरुवार पासून मालोडी टोल नाक्यावर आमरण उपोषणास बसले आहेत. या आंदोलनात महेंद्र पाटील यांच्या सोबत खारबाव  ग्राम पंचायतीचे एकूण १३ सदस्य तसेच जिल्ह्या परिषद सदस्य रत्ना तांबडे , राष्ट्रवादीच्या सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष व जैष्ठ कार्यकर्ते कमलाकर टावरे , मालोडीचे उपसरपंच विशाल पाटील , राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष गणेश गुळावी , प्रवीण पाटील , प्रशांत म्हात्रे आदी कार्यकर्त्यांसह साईस गृपचे तरुण कार्यकर्ते देखील य उपोषण आंदोलनात सहभागी झाले आहेत. दरम्यान शुक्रवारी रात्री सरपंच महेंद्र पाटील त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना खासगी रुग्णलयात हलविण्यात आले होते, मात्र उपचार घेतल्यांनातर शुक्रवारी पहाटे पुन्हा उपोषणस्थळी येत सरपंचांनी आपले उपोषण सुरूच ठेवले असून त्यांची मनधरणी करण्यासाठी आज ( शनिवारी ) दुपारी सार्वजनिक बंधकाम विभागाचे अधिकारी सरपंच पाटील यांची भेट घेणार आहेत.

या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी स्थानिक नागरिकांनी एकत्र येत या महामार्गावर रास्ता रोको आंदोलने देखील केली आहेत. मात्र प्रत्येक आंदोलनावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन व टोल कंपनी नागरिकांना रस्ता लवकरात लवकर दुरुस्तीचे आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्यास सांगतात व रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्याची आश्वासने देतात. त्यांनतर आंदोलन स्थगित झाल्या नंतर रस्त्याची थातूर मातूर दुरुस्ती करून सार्वजनिक बांधकाम विभाग व टोल कंपनी आपले हात झटकतात. ज्याचा त्रास स्थानिक नागरिकांसह वाहन चालक व प्रवाशांना होत आहे. मात्र याकडे सुप्रीम कंपनीबरोबरच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे या रस्त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

सुप्रीम कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या रस्त्याबाबत दुर्लक्षित धोरणामुळे या रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी खरबावचे सरपंच महेंद्र पाटील हे गुरुवकार पासून उपोषणास बसले असून, हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा, रस्ता जोपर्यंत दुरुस्त होत नाही तोपर्यंत टोल नाका बंद करावा, काँक्रेटकरणाचे व दुरुस्तीचे काम उच्च दर्जाचे असावे, रस्त्याची अपूर्ण कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत या व अशा मागण्यांसाठी सरपंच महेंद्र पाटील हे गुरुवार पासून मालोडी टोल नाक्याच्या बाजूलाच उपोषणाला बसले आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी प्रतिक्रिया उपोषणकर्ते महेंद्रपाटील यांनी दै. लोकमतला दिली आहे. 

टॅग्स :Bhiwandiभिवंडी