शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पालखी रथासाठी सर्जा-राजा, माणिक-राजाची निवड

By admin | Updated: May 31, 2017 01:43 IST

श्री संत तुकाराम महाराजांच्या ३३२ व्या पालखी सोहळ्यासाठी लोहगाव (ता. हवेली) येथील भानुदास भगवान खांदवे यांच्या सर्जा-राजा व

लोकमत न्यूज नेटवर्कदेहूगाव : श्री संत तुकाराम महाराजांच्या ३३२ व्या पालखी सोहळ्यासाठी लोहगाव (ता. हवेली) येथील भानुदास भगवान खांदवे यांच्या सर्जा-राजा व चिंबळी (ता. खेड) येथील अप्पासाहेब महादू लोखंडे यांच्या माणिक-राजा या बैलजोडींना संस्थानच्या वतीने पालखी रथ ओढण्याची सेवा करण्याची संधी देण्यात आली आहे.संस्थानच्या वतीने पालखी सोहळा प्रमुख अभिजितमहाराज मोरे यांनी बुधवारी ही घोषणा केली. या वेळी सुनीलमहाराज मोरे, संस्थानचे अध्यक्ष पंढरीनाथ मोरे, सुनील दामोदर मोरे, विठ्ठल मोरे आदी उपस्थित होते. निवड करताना बैलांचे वय, छाती, शिंगे, वशिंड, रंग, शेपटी, खूर, त्यांची चाल व काम करण्याची क्षमता यांची पाहणी करून त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्रही घेण्यात आले आहे. या निकषांनुसार सर्व बैलजोडींचे परीक्षण करण्यात आल्याची माहिती अभिजित मोरे यांनी दिली. रथासाठी सेवा देण्यासाठी पुणे जिल्ह्यातील १७ आणि सातारा जिल्ह्यातील एका बैलजोडी मालकाने संस्थानकडे अर्ज केले होते. सुनील मोरे म्हणाले की, पालखी सोहळ्यात पालखीच्या रथाचे मानकरी असलेल्या बैलांची, मानाच्या अश्वांची व नगारखान्याच्या बैलांची देखील चोख व्यवस्था ठेवली जाते. या सर्वांना पिण्यासाठी शुद्ध पाणी, व आंघोळीसाठी गरम पाण्याची व्यवस्था केली जाते. सकस आहार आणि चालण्याचा सरावभानुदास खांदवे यांच्या सर्जा व राजा या बैलांना सरकी व शेंगदाना पेंड, उडीद भरडा, मक्याचा भरडा, विलायती गवत, कडबा कुट्टी व हिरवा मका आणि उसाच्या वाढ्याची कुट्टी अशा प्रकारचा आहार दिला जात आहे. त्यांना चालण्याचा सराव दिला जात आहे. पालखी सोहळ्यात मोठ्या प्रमाणात जनसमुदाय असल्याने बैलांना गर्दीची सवय व्हावी यासाठी त्यांना सातत्याने मानवी संपर्कात ठेवले जात आहे. रथाला जुंपल्यानंतर बैल बुजणार नाही किंवा उधळणार नाही यासाठी काळजी घेतली जात आहे. अप्पासाहेब लोखंडे यांच्या माणिक-राजा या बैलजोडीला देखील गव्हाचा, मक्याचा भरडा दिला जात आहे. विलायती गवत, कडबा, सरकी व शेंगदाणा पेंड दिली जात असून, बैलांना चालण्याचा सरावही करून घेतला जात आहे.