शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मतदान करणाऱ्यांना सलाम, न करणाऱ्यांनाही सलाम..!

By अतुल कुलकर्णी | Updated: January 18, 2026 08:05 IST

मत विकत घेणाऱ्यांना सलाम मताचे दान करणाऱ्यांना सलाम..... विकत घेण्याची भाषा केलेल्यांना सलाम, सलाम, भाई, सबको सलाम.

अतुल कुलकर्णी

सलाम, सबको सलाम ज्याने केले मतदान त्याला सलाम, ज्याने चार दिवस सुट्टी घेऊन भरपूर मजा केली त्यांनाही सलाम.... डाव्या हातात धुम्रकांडी धरून, उजव्या हाताने चष्मा सरळ करत मतदान करणाऱ्या, न करणाऱ्यांना वेडे ठरवणाऱ्यांना, सगळ्या सगळ्यांना सलाम..!

मत विकत घेणाऱ्यांना सलाम मताचे दान करणाऱ्यांना सलाम..... विकत घेण्याची भाषा केलेल्यांना सलाम, सलाम, भाई, सबको सलाम.

निवडणुकीच्या काळात एकमेकांच्या अंगावर धावून जाणाऱ्यांना सलाम... चाकू, सुरी, कोयता अशी हत्यारे आपल्यासाठीच असे म्हणणाऱ्यांना सलाम.... डोळे वटारून बघणाऱ्यांना सलाम, शेंदूर फासलेल्या नेत्यांना सलाम, करोडो रुपये उधळणाऱ्यांना सलाम, निवडणुकीचे कंत्राट घेणाऱ्यांना सलाम, रांगा लावून मतदान करणाऱ्यांना सलाम, धुपारे, अंगारे, काळ्या बाहुल्या गाडीखाली ठेवणाऱ्यांना सलाम... भीती दाखवून मत मागणाऱ्यांना सलाम, त्यांच्या साहेबांना सलाम यांच्या साहेबांना सलाम..... सलाम, प्यारे भाईयों और भैनो, सबको सलाम.

निवडून आलेल्यांना सलाम, निवडून आणलेल्यांना ही सलाम.... सभांना गर्दी करणाऱ्या लाखोंना सलाम, गर्दी करूनही मत न देणाऱ्यांना सलाम.... मतांसाठी कुकरचे प्रेशर देणाऱ्यांना सलाम, सोसायटीला रंग लावून देणाऱ्यांना सलाम, पाच वर्ष केबलचे बिल भरणाऱ्यांना सलाम, लाखो करोडो इकडून तिकडे नेणाऱ्या ड्रायव्हर दादांनाही सलाम.... सलाम, प्यारे दोस्तों, सबको सलाम.

निवडणुका झाल्या, आता एकोप्याने राहू असे म्हणणाऱ्यांना सलाम... भांड भांड भांडून झाल्यावर, गळ्यात गळे घालून फिरणाऱ्यांना सलाम.... आपण सारे भाऊ भाऊ, सगळे काही मिळून खाऊ, असे पाच वर्ष वागणाऱ्यांना सलाम सलाम, भाइयों और भैनों, सबको सलाम.

कोण जिंकला कोण हरला, याची पोटतिडकीने चर्चा करत, गाडीत चेंगरणाऱ्या गर्दीला सलाम.... फुटपाथवर जागा नाही म्हणून रस्त्यावरून चालताना, बेस्ट खाली चिरडून मरणाऱ्यांना सलाम.... फुटपाथवरच्या भय्यांकडून हप्ते गोळा करणाऱ्यांना सलाम..... खाण्यापिण्यात भेसळ करणाऱ्यांना सलाम, ओला-सुका कचरा वेगळा ठेवणाऱ्यांना सलाम..... दोन्ही कचरे एकत्र करून नेणाऱ्या पालिकेला सलामच सलाम.... सलाम, भाइयों और भैनों, सबको सलाम.

निवडणुकीला सलाम, वेगवेगळ्या रंगांच्या झेंड्यांना सलाम.... मतांचे बटन दाबलेल्या बोटाला सलाम पुढची पाच वर्ष रस्त्यावरचे खड्डे, कचरा, अतिक्रमण, दादागिरी, सगळं काही निमूट सहन करण्याचा शब्द देणाऱ्यांना सलाम... सोसायटीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर उभी फूट पाडणाऱ्यांना सलाम.... आपल्यात भांडण लावून निवडणूक जिंकणाऱ्यांना सलाम..! जे दुखावले असतील त्यांना सलाम जे आनंदी झाले त्यांना सलाम.... दादा, मामा, काका, भाऊ जात, धर्म, भाषा, प्रांत.... यांच्यात फूट पाडणाऱ्यांना सलाम... हे सगळे असेच वाढत रहावे, असे म्हणणाऱ्यांनाही सलाम...

सलाम प्यारे भाइयों और भैनों, सबको सलाम, अनेक हात असते तर अनेक हातांनी केला असता सलाम, लेकिन माफ करना भाइयों, हात तर दोनच, त्यामुळे डाव्या हातात धुम्रकांडी धरून उजव्या हाताने चष्मा सरळ करत तुम्हा सगळ्यांना सलाम... इथेच भेटलात म्हणून सलाम पुन्हा भेटू नका म्हणून सलाम... आम्हाला आमच्या परिस्थितीवर आहे तसेच सोडून द्या म्हणून सलाम... पुढची पाच वर्ष तुमचे आमचे देणे-घेणे नाही म्हणणाऱ्यांना सलाम..... भाइयों और भैनों, सबको सलाम. कविवर्य मंगेश पाडगावकर तुमची क्षमा मागत तुम्हालाही सलाम.... - तुमचाच बाबूराव

English
हिंदी सारांश
Web Title : A Salute to Voters and Non-Voters: A Satirical Take

Web Summary : The article sarcastically salutes everyone involved in elections, from voters and non-voters to corrupt individuals and those exploiting societal divisions. It highlights the ironies and contradictions within the electoral process and society.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६