शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग श्रेयाच्या शैक्षणिक प्रवासात वडिल झाले ‘सारथी’!

By admin | Updated: February 15, 2017 19:45 IST

तीच्या पित्याचे हे बोल... अन् त्यासाठी तीच्या शैक्षणिक प्रवासात ते झाले तीचे ‘सारथी’...

सुनील काकडे / वाशिमती जणू सावित्रीची लेक... तीच्या अंगी शिकण्याची आगतिकता... शैक्षणिक अभ्यासक्रमातील सगळ्याच विषयात ती पारंगत... पण, नियतीने बालपणातच तीचे दोन्ही पाय हिरावून घेतले... त्याचा शिक्षणावर मात्र तसूभरही परिणाम झाला नाही... ती शिकणार, शिकून चांगली मोठी होणार, अशी पक्की खूनगाठ मनाशी बांधलेल्या जन्मदात्याचे, तीच्या पित्याचे हे बोल... अन् त्यासाठी तीच्या शैक्षणिक प्रवासात ते झाले तीचे ह्यसारथीह्ण...लाठी, ता. मंगरूळपीर येथे वास्तव्यास असलेल्या श्रेया राजेश सुर्वे या दोन्ही पायांनी दिव्यांग मुलीच्या शिक्षणासाठी तीच्या वडिलांकडून होत असलेले प्रयत्न निश्चितपणे वाखानण्याजोगे आहेतच; शिवाय मुलीचा गर्भातच गळा घोटणाऱ्या निर्दयी मातापित्यांसमोर वेगळा आदर्श निर्माण करणारे आहे. सन २००६ साली पहिल्या वर्गात प्रवेश घेण्याची तयारी सुरू असताना श्रेयाला अनोळख्या आजारात अचानकपणे दोन्ही पायांना अपंगत्व आले. मात्र, शेतकरी असलेल्या राजेश सुर्वे या तीच्या पित्याने हिंमत हारली नाही. गावातीलच जिल्हा परिषद शाळेत तीच्या शिक्षणाची तजवीज यांनी केली. श्रेयानेही वडिलांच्या या हिंमतीची परतफेड करित शिक्षणात सुरूवातीपासूनच अव्वल क्रमांकाचे स्थान मिळविले आहे. सहाव्या वर्गासाठी तीची जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षणासाठी निवड झाली होती. मात्र, केंद्रशासनाकडून मदतनिसची परवानगी आणल्यासच तीला प्रवेश मिळणार होता. वडिलांच्या मनाला ही बाब पटली नाही आणि त्यांनी श्रेयाला जिल्हा परिषद शाळेतच शिकविण्याचा निर्धार केला. श्रेया सद्या नवव्या वर्गात शिकत असून गेल्या ९ वर्षांपासून सकाळी १०.३० वाजता तीचे वडिल राजेश सुर्वे हे तीला तीनचाकी सायकलवर ठेवून दोन किलोमिटरचा पायदळ प्रवास करत शाळेत सोडून येतात. त्यानंतर शेतातील सर्व कामे आटोपून पुन्हा सायंकाळी ४.३० वाजता ते तीला घ्यायला देखील जातात. त्यांचा हा दैनंदिन कार्यक्रम अविश्रांत सुरू आहेत. आपल्या दिव्यांग कन्येच्या शिक्षणासाठी झटत असलेल्या या पित्याचे हे कार्य खरोखरच इतरांसमोर प्रेरणादायी ठरत आहे.