शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘सैराट’ने तरुण पिढीचे वाटोळे केले!

By admin | Updated: June 27, 2016 04:38 IST

कमी वेळेत भरपूर पैसा कमविण्यासाठी दिग्दर्शक, निर्माता ‘सैराट’सारखे चित्रपट काढतात.

हिवरेबाजार (अहमदनगर) : कमी वेळेत भरपूर पैसा कमविण्यासाठी दिग्दर्शक, निर्माता ‘सैराट’सारखे चित्रपट काढतात. त्यामुळे तरुण पिढी बरबाद होते. ‘सैराट’ने तरुण पिढीचे वाटोळे केले. स्वत:च्या पायावर उभे राहा, शिक्षण पूर्ण करा, मग सैराट व्हा, असा सल्ला जलसंधारण तथा जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी येथे तरुणांना दिला.नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ने मराठी चित्रपटाच्या उत्पन्नाचे सर्व विक्रम मोडले आहेत. मराठी रसिकांना या चित्रपटाने वेड लावले आहे. एवढेच नव्हेतर, मराठीतील या लोकप्रिय चित्रपटाचा आता तेलगु, कन्नड, तमीळ आणि मल्याळम् भाषेत रिमेक होणार आहे. तेलगु चित्रपट स्वत: नागराज दिग्दर्शित करणार असल्याचे समजते. शिवतारे यांनी मात्र अशा चित्रपटांमुळे तरुण पिढी बरबाद होते, अशी भीती व्यक्त केली आहे. तरुणांनी अभ्यासात लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे त्यांनी हिवरेबाजार (ता. नगर) येथील जलसंधारण व विकासकामांची पाहणी केल्यानंतर सांगितले. देशाचा विकास करायचा असेल तर अगोदर गावे सुधारली पाहिजेत. ग्रामीण भागासाठी सरकारी योजना भरपूर आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीही उपलब्ध आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होणे गरजेचे आहे. त्यासाठी गावकऱ्यांचे संघटन व एकोपा महत्त्वाचा आहे, असेही त्यांनी गावकऱ्यांना सांगितले. पोपटराव पवार यांच्यासारखे अभ्यासू नेतृत्व गावाला लाभले. निवडणूक बिनविरोध झाली तर गावाचा आपोआप विकास होईल. जलयुक्त शिवार योजनेमुळे पाण्याची पातळी वाढणार आहे. शेतकऱ्याला त्याचा फायदा होणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवतारे यांच्या हस्ते गावात वृक्षारोपणही करण्यात आले. रविवारची सुट्टी असूनही येथील आरोग्य उपकेंद्र चालू असल्याचे पाहून त्यांनी येथील कर्मचारी ज्योती तोडमल यांचे कौतुक केले. सुट्टीच्या दिवशी उपकेंद्र चालू ठेवणारे हे राज्यातील एकमेव गाव असल्याचेही ते म्हणाले. (वार्ताहर)>तरुण पिढी ही याआधी टीव्हीवरील मालिकांमुळे बिघडत चालली होती. आता तर आधुनिक तंत्रज्ञान, व्हॉटस् अ‍ॅपमुळे तरुण वर्ग बिघडत चाललेला दिसत आहे.- विजय शिवतारे, जलसंधारण व जलसंपदा राज्यमंत्री