शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

सप्तशृंगीच्या गडावर दरड कोसळली!

By admin | Updated: June 13, 2017 02:28 IST

लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले साडेतीन पीठांमधील अर्धेपीठ श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर सोमवारी सायंकाळी पावणेपाच वाजता मोठी दरड कोसळली.

- लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले साडेतीन पीठांमधील अर्धेपीठ श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर सोमवारी सायंकाळी पावणेपाच वाजता मोठी दरड कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जिवित हानी झाली नाही. मंदिर परिसरात ज्या संरक्षक जाळ्या बसविण्यात आल्या आहेत त्यामध्ये दोन मोठे दगड अडकल्याने अनर्थ टळला. कोसळलेल्या एका दगडाचे वजन अंदाजे सहाशे किलो आहे. सप्तशृंगगड परिसरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मंदिराच्या जवळच असलेले दोन कडे सुटलेले असल्याने तेथे संरक्षक जाळी लावण्यात आली होती. सोमवारी चारच्या सुमारास पाऊस थांबला. पावणेपाच वाजता प्रचंड आवाजाने गड हादरला. काय होते आहे, हे कळण्याच्या आतच मंदिराच्या बाजूला सुटलेल्या दोन कड्यांपैकी एक दरड वेगाने खाली आली आणि संरक्षक जाळीत अडकली. ज्यावेळी दरड कोसळली तेव्हा मंदिरात थोडेच भाविक उपस्थित होते. ते सर्वजण तत्काळ सुरक्षित स्थळी आले. ग्रामस्थ व व्यापारी बांधवदेखील आवाजाने घाबरुन रस्त्यावर आले. परंतु दरड संरक्षीत जाळीत अडकल्याचे पाहून सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दरड कोसळल्यानंतर सर्वच भाविकांनी गडाखाली धाव घेतली मात्र हे दगड संरक्षक जाळीमध्ये अडकल्याचे समजताच सर्वांना हायसे वाटले.