शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

संतोष माने प्रकरण एसटीला भोवले

By admin | Updated: January 25, 2016 01:03 IST

बेदरकारपणे एसटी बस चालवून नऊ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले संतोष माने प्रकरण एसटी महामंडळाला सुमारे १ कोटी ६८ लाख रुपयांना भोवले आहे.

पुणे : बेदरकारपणे एसटी बस चालवून नऊ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले संतोष माने प्रकरण एसटी महामंडळाला सुमारे १ कोटी ६८ लाख रुपयांना भोवले आहे. या प्रकरणात मृतांचे नातेवाईक, जखमी व काही वाहनचालकांनी नुकसानभरपाई मिळण्यासाठी न्यायालयात दावा दाखल केला होता. हे सर्व दावे निकाली निघाले असून त्याअंतर्गत ९ टक्के व्याजदराने सुमारे ९८ लाख १३ हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.चार वर्षांपूर्वी म्हणजे २५ जानेवारी २०१२ रोजी सकाळी शहरात संतोष माने याने मृत्यूचे थैमान घातले. स्वारगेट एसटी बसस्थानकातील बस पळवून नेत त्याने अनेकांना उडविले. त्यात ९ जणांचा मृत्यू झाला, तर २७ जण जखमी झाले. तसेच ४० ते ५० वाहनांचे नुकसान झाले. या घटनेला सोमवारी चार वर्षे पूर्ण होत आहेत. या प्रकरणात सुरुवातीला एसटीने तातडीची मदत म्हणून मृतांचे नातेवाईक व जखमींना अनुक्रमे ३ लाख व ५० हजार असे एकूण ७० लाख रुपये दिले. तसेच जखमींच्या उपचाराचा खर्चही एसटीने केला. या घटनेनंतर नुकसानभरपाई मिळण्यासाठी मोटार अपघात न्याय प्राधिकरणात ११ दावे दाखल झाले. या दाव्यांतील शेवटचा निकाल १६ जानेवारीला लागला, तर तीन महिन्यांपूर्वीच पहिला निकाल लागला होता. या सर्व निकालांमध्ये न्यायालयाने एसटीला ९ टक्के व्याजदराने ९८ लाख ६८ हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. आधीचे ७० लाख व व्याजासह नुकसानभरपाईची सुमारे १ कोटी ३० लाख रुपयांची रक्कम एकत्रित केल्यास हे प्रकरण एसटीला १ कोटी ६८ लाख रुपयांना भोवले.एकूण ११ दाव्यांमध्ये ७ दावे घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या वारसदारांनी दाखल केले होते, तर घटनेत जखमी झालेल्या आणि गाडीचे नुकसान झालेल्या व्यक्तीने प्रत्येकी दोन दावे दाखल केले होते. या दाव्यामध्ये एसटी महामंडळाकडे तब्बल ३ कोटी २७ लाख रुपये नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली होती. एसटी महामंडळाचे सल्लागार अ‍ॅड. अतुल गुंजाळ यांनी अर्ज केल्यानंतर हे सर्व दावे सत्र न्यायाधीश ए. जी. बिलोलीकर यांच्या न्यायालयात वर्ग करण्यात आले होते. काही दाव्यातील फुगीर रकमेची मागणी अमान्य करीत न्यायालयाने ९८ लाख १३ हजार ८०० रुपयांची नुकसानभरपाई दावा दाखल केलेल्या तारखेपासून ८ टक्के व्याजाने देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.