शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

संतोष चौधरींसह पाच जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा

By admin | Updated: February 12, 2017 20:54 IST

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवींद्र नाना पाटील यांच्यासह पाच जणांनी मारहाण केल्याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

ऑनलाइन लोकमतभुसावळ, दि. 12 - साकेगाव-कंडारी गटातील शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार ज्ञानेश्वर आमले यांना निवडणुकीत शांत बैस म्हणत माजी आमदार संतोष चौधरी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवींद्र नाना पाटील यांच्यासह पाच जणांनी मारहाण केल्याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. आशिया महामार्गावरील छोटूचा ढाब्यावर रविवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. तक्रारदार ज्ञानेश्वर विठ्ठल आमले (वय ३४, ज्ञानज्योती विद्यालय,खडका) यांनी बाजारपेठ पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्यासह कार्यकर्ते छोटूचा ढाबा येथे जेवणासाठी शनिवारी रात्री ११़३० वाजेच्या सुमारास गेले होते. जेवण आटोपल्यानंतर ते बाहेर पडत असताना माजी आमदार संतोष चौधरींना त्यांना बोलावून उमेदवारीस उभे राहण्याची तुझी लायकी नाही म्हणत शांत बैस, असे सांगितले व हातातील काठीने तसेच हाताच्या बुक्क्याने मारहाण करून शर्टही फाडला. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवींद्र नाना पाटील यांच्यासह अनोळखी तिघांनीही मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकारानंतर मोठी गर्दी झाली़ शहरातील डॉ़नीलेश महाजन यांच्याकडे प्रथमोपचार केल्यानंतर जळगाव सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आले. आमले यांच्या तक्रारीनंतर संतोष चौधरींसह रवींद्र नाना पाटील व अन्य तीन अनोळखींसह पाच जणांविरुद्ध भाग पाच, गुरनं३७/१७, भादंवि ३२४, १४३, १४७, १४९, ४२७, ३७ (१) (३३) चे कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास निरीक्षक चंद्रकांत सरोदे करीत आहेत. दरम्यान, सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी या प्रकाराबाबत बाजारपेठ पोलीस ठाण्यात रविवारी येवून माहिती जाणून घेतली. पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे म्हणाले की, जामीनपात्र गुन्हा आहे, त्यामुळे संशयित आरोपींना अटक करण्याआधी सर्व पुरावे गोळा करण्याचे तसेच तीन अनोळखींना शोध घेण्याचे काम सुरू आहे. >विरोधकांना डोळ्यापुढे पराभव दिसत असल्याने त्यांनी राजकीय दबाव टाकून माझ्यासह इतरांविरुद्ध खोटा गुन्हा दाखल केला आहे. ज्ञानेश्वर आमले यांना आपण जवळसुद्धा बोलावले नाही़ ते मद्यधुंद अवस्थेत होते, पायावर उभे राहता येत नसताना ते जवळ आले व खाली पडले. पोलिसांनी सत्य परिस्थिती तपासून गुन्ह्याचा तपास करावा. आपणही संबंधितांविरुद्ध तक्रार दाखल करणार आहोत.- संतोष चौधरी, माजी आमदार