शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

संत सोपानदेव निघाले ज्ञानोबाच्या भेटीला

By admin | Updated: June 22, 2017 07:20 IST

ग्यानबा-तुकाराम’च्या जयघोषात, टाळमृदंगाच्या निनादात, भगव्या पताकांच्या भाऊगर्दीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे धाकटे बंधू संत सोपानदेव यांच्या पालखीचे

सासवड : ‘ग्यानबा-तुकाराम’च्या जयघोषात, टाळमृदंगाच्या निनादात, भगव्या पताकांच्या भाऊगर्दीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे धाकटे बंधू संत सोपानदेव यांच्या पालखीचे आषाढी वारीकरिता बुधवारी (दि. २१) सासवडहून वैभवशाली प्रस्थान झाले. पालखीचा आज पांगारे गावी मुक्काम आहे. हजारो सासवडकरांनी या सोहळ्याला हजेरी लावून हा अनुभव ‘याचि देही याचि डोळा’ घेतला.दरम्यान, आज आषाढ वद्य बारस (द्वादशी) आणि सोपानदेव पालखीचा प्रस्थान दिन असल्याने मंदिरात पहाटे चार वाजता काकडआरती, अभिषेक, महापूजा आदी धार्मिक विधी झाले. त्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. संत ज्ञानदेव माऊलींचा आज सासवड मुक्काम सकाळी ११ वाजता प्रस्थान कार्यक्रमाला सुरुवात झाली. सर्वप्रथम मानाच्या दिंड्यांचा आत घेण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर दिंडीप्रमुखांचे मानाचे अभंग झाले.त्यानंतर सोपानदेव देवस्थान ट्रस्ट, संत सोपानकाका बँक व अन्य संघटनांकडून आणि सासवड नगरपालिकेकडून दिंडीप्रमुखांचे सत्कार करण्यात आले. ‘माझिया वडिलांची मिराशी गा देवा..तुझी चरणसेवा बा पांडुरंग’ हा अभंग होऊन दुपारी ठीक १ वाजता पालखीची एक मंदिर प्रदक्षिणा होऊन पालखी उत्तरेकडील दरवाजाने, तर पादुका पूर्वेकडील मुख्य दरवाजातून आणून हा सोहळा देऊळवाड्यातून बाहेर पडला. आजच्या प्रस्थान कार्यक्रमाला, सोपानकाका बँकेचे चेअरमन संजय जगताप, नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, मुख्याधिकारी विनोद झळक, बँक आॅफ इंडियाचे अधिकारी नंदकिशोर सोनार, मिलिंद कर्वे, सासवड शाखाप्रमुख नीलेश मोरे, माजी नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप, नगरसेवक अजित जगताप, संदीप जगताप, मनोहर जगताप, सारिका हिवरकर, वसुधा आनंदे, कृषी परिषदेचे माजी उपाध्यक्ष विजय कोलते तसेच आळंदी, देहू, पंढरपूर, मुक्ताईनगर येथील देवस्थानचे प्रतिनिधी आणि भाविक उपस्थित होते. दुपारी जेजुरी नाक्यावरून हजारो भाविकांच्या उपस्थितीत पालखी सोहळा मार्गस्थ झाला. काही वेळाने संत चांगा वटेश्वर पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले.