मुंबई : इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या उत्पादनात देशात अग्रेसर असलेल्या सॅनसुई कंपनीने नुकतीच ‘कर्व्ह ४के अल्ट्रा एचडी एलईडी’ ही दूरचित्रवाणी संचाची नवी मालिका सादर केली असून या अंतर्गत अल्ट्रा एचडी, यूएचडी आणि स्मार्ट कनेक्ट सिरिजमधील १० नवीन मॉडेल्स सादर केली आहेत. इंडियन प्रीमीयम लीगच्या सामन्यांतील दोनवेळचे विजेते असलेल्या कोलकाता नाईड रायडर गेल्या तीनवर्षांपासून कंपनी सहयोगी असून कंपनीच्या या नव्या सिरिजचे उद्घाटन गौतम गंभीर, मॉर्न मॉर्केल, युसुफ पठाण, रॉबिन उथप्पा, ब्रेड हॉग, अॅन्ड्रे रस्सेल या नामांकित क्रिकेटपटूंच्या हस्ते झाले. सध्या आयपीएलचे सामने सुरू असून ते सर्व रोमहर्षक सामने लोकांना उत्तम दर्जाच्या व अत्याधुनिक तंत्राच्या सहाय्याने बघता यावे, म्हणून आयपीएलच्या दरम्यान हे टीव्ही सादर केले असल्याची माहिती कंपनीचे चीफ आॅपरेटिंग आॅफिसर अमिताभ तिवारी यांनी दिली. (प्रतिनिधी)
सॅनसुईने सादर केली कर्व्ह मालिकेतील मॉडेल्स
By admin | Updated: April 29, 2016 05:27 IST