शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

तुर्कस्थानमध्ये संजीवनी जाधव हिने फडकवला नाशिकचा झेंडा ; मिळविले ‘सिल्वर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 22:43 IST

संजीवनी जाधव हिने सातत्यपूर्ण कामगिरी करीत एशियन, वर्ल्ड युनिव्हर्सिटी आणि आता तुर्कस्थान येथे सुरू असलेल्या ‘एशियन इनडोअर’मध्येही चमकदार कामगिरी करत रजत पदक मिळविले. यापुर्वी तिने एशियन स्पर्धेत दहा हजार मीटरमध्ये ब्रांझ तर वर्ल्ड युनिव्हर्सिटी स्पर्धेत पाच हजार मीटरमध्ये सिल्वर पदक मिळविले आहे

ठळक मुद्दे अ‍ॅथेलेटिक्सच्या २० खेळाडूंची नावे निवडण्यात आली. त्यामध्ये १५व्या क्रमांकावर संजीवनी एशियन इनडोअर स्पर्धेत नाशिकची धावपटू संजीवनी जाधव हिने तीन हजार मीटरमध्ये ‘सिल्वर’ पदक हा हजार मीटरमध्ये ब्रांझ तर वर्ल्ड युनिव्हर्सिटी स्पर्धेत पाच हजार मीटरमध्ये सिल्वर पदक मिळविले आहे तीन महिन्यांत सलग तीन आंतरराष्ट्रीय पदक मिळविण्याचा पराक्रम

नाशिक : तुर्कस्थान येथे सुरू असलेल्या एशियन इनडोअर स्पर्धेत नाशिकची धावपटू संजीवनी जाधव हिने तीन हजार मीटरमध्ये ‘सिल्वर’ पदक मिळविले. संजीवनीचे हे आंतरराष्टÑीय स्तरावरील तीसरे पदक आहे.संजीवनी जाधव हिने सातत्यपूर्ण कामगिरी करीत एशियन, वर्ल्ड युनिव्हर्सिटी आणि आता तुर्कस्थान येथे सुरू असलेल्या ‘एशियन इनडोअर’मध्येही चमकदार कामगिरी करत रजत पदक मिळविले. यापुर्वी तिने एशियन स्पर्धेत दहा हजार मीटरमध्ये ब्रांझ तर वर्ल्ड युनिव्हर्सिटी स्पर्धेत पाच हजार मीटरमध्ये सिल्वर पदक मिळविले आहे. नुकतीच तिची २०२०मध्ये टोकियोला होणाºया आॅलिम्पिक स्पर्धेच्या संभाव्य खेळाडूंमध्ये निवड झाल्यानंतर कारकि र्दीतील तीसरे आंतरराष्ट्रीय पदकही तीने सोमवारी (दि.१८) मिळविले. या विजयामुळे तीचा आत्मविश्वास अधिकच उंचावला आहे. तीन महिन्यांत सलग तीन आंतरराष्ट्रीय पदक मिळविण्याचा पराक्रमही संजीवनीने आपल्या नावावर नोंदविला आहे.

 

आता लक्ष्य टोकिओ : आॅलिम्पिकपर्यंत केंद्राकडून प्रशिक्षण

२०२० मध्ये टोकिओ येथे होणाºया आॅलिम्पिक स्पर्धेपर्यंत नाशिकची धावपटू संजीवनी जाधव हिची संभाव्य खेळाडूंमध्ये टॉप्स योजनेत निवड करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या ‘इलाइट अ‍ॅथेलिट आयडेन्टीफीकेशन कमिटी’ने जाहीर केलेल्या देशभरातील २० धावपटूंच्या यादीमध्ये संजीवनीच्या नावाचा समावेश आहे. या यादीनुसार आॅलिम्पिकमध्ये देशाला पदक मिळवून देण्याची क्षमता असणाºया खेळाडूंची निवड केली जाते. यापूर्वी २०१६ मध्ये कविता राऊत भारतासाठी आॅलिम्पिक स्पर्धा खेळली होती. संजीवनी प्रत्यक्ष मैदानात उतरली, तर ती कविता नंतर नाशिकची दुसरी आॅलिम्पिकपटू ठरेल.जगभरातील खेळाडूंसाठी क्रीडा पंढरी म्हणून ओळख असलेल्या आॅलिम्पिक स्पर्धेचे दार संजीवनीसाठी उघडले असल्याने नाशिककसाठी ही भूषणावह बाब ठरली आहे. संजीवनी हिने हंगामातील उत्कृष्ट कामगिरी करताना केंद्र सरकारच्या समितीचे लक्ष वेधून घेतले होते. देशासाठी आॅलिम्पिकमध्ये पदक मिळवून घेण्याची धमक असलेल्या विविध खेळांतील सुमारे १५२ खेळाडूंची यादी केंद्र सरकारने जाहीर केली आहे. त्यामध्ये अ‍ॅथेलेटिक्सच्या २० खेळाडूंची नावे निवडण्यात आली. त्यामध्ये १५व्या क्रमांकावर संजीवनी जाधवच्या नावाचा समावेश करण्यात आलेला आहे. संजीवनीची एकूणच कामगिरी पाहता देशासाठी ती नक्की आॅलिम्पिक खेळू शकेल, असा विश्वास तिचे प्रशिक्षक विजेंद्रसिंग यांनी अनेकदा व्यक्त केला होता. त्यांचा हा विश्वास यामुळे सार्थ ठरला आहे. संजीवनीने नुकतेच एशियन स्पर्धेत ब्राँज पदक पटकाविले आहे, तर जागतिक युनिव्हर्सिटी स्पर्धेतही तिने सिल्व्हर पदक पटकाविले आहे. सध्या ती तुर्किस्तान येथे असून एशियन इंनडोअर स्पर्धा खेळत आहे.