शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

संजय रायमुलकर यांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द !

By admin | Updated: January 20, 2016 02:25 IST

सेनेच्या आमदारास विभागीय जात पडताळणी समितीचा धक्का; राखीव प्रवर्गातील लाभ काढून घेण्याचा आदेश.

अकोला: बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर या राखीव मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार संजय रायमुलकर यांचे बलाई जातीचे प्रमाणपत्र रद्द करुन शासनजमा करण्याचा आदेश अकोल्याच्या विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीने मंगळवारी दिला. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आ.रायमुलकर यांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याने, त्यांना देण्यात आलेले लाभ जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने काढून घ्यावेत, असे आदेशही समितीने दिले. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आ. संजय भास्करराव रायमुलकर यांची जात सुतार असताना, त्यांनी बलाई जातीचे प्रमाणपत्र सादर केले. याबाबत बुलडाणा येथील अँड.साहेबराव अश्रूजी सरदार आणि ९ जणांनी अकोल्याच्या विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सन २00९ मध्ये अपील दाखल केले होते. या प्रकरणात विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीच्यावतीने ३१ डिसेंबर २0१५ रोजी निर्णय पारीत करण्यात आला. त्यानुसार आ.संजय रायमुलकर यांचा बलाई जातीचा दावा अमान्य करण्यात आला असून, तक्रारदार अँड.साहेबराव सरदार व इतर ९ जणांची तक्रार ग्राह्य धरण्यात आली. जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीने मंगळवारी याबाबत निकाल देताना, आ.रायमुलकर यांना बुलडाणा उपविभागीय अधिकार्‍यांनी २00६ साली दिलेले बलाई जातीचे प्रमाणपत्र रद्द ठरवून ते शासनजमा करण्याचा आदेश दिला. आ.रायमुलकर हे अनुसूचित जातीसाठी राखीव प्रवर्गातून निवडून आल्याने आणि त्यांचे जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आल्याने त्यांना देण्यात आलेले लाभ काढून घेण्याबाबत बुलडाणा जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने कारवाई करण्याचा आदेशही विभागीय जाती प्रमाणपत्र समितीने दिला. बुलडाणा जिल्ह्यात एकूण ७ विधानसभा मतदारसंघ असून, त्यापैकी दोन मतदारसंघ सध्या शिवसेनेच्या ताब्यात आहेत.