ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ - शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पक्षाच्या प्रवक्तेपदावरुन डच्चू देण्यात आला आहे. तर मनोहर जोशी, सुभाष देसाई यांनाही प्रवक्तेपदावरुन हटवण्यात आले असून त्यांच्याऐवजी अमोल कोल्हे, अरविंद सावंत, अरविंद भोसले, डॉ. मनिषा कायंदे अशा नवीन चेह-यांना प्रवक्तेपदी संधी देण्यात आली आहे.
पक्ष प्रवक्ते हे माध्यमांसमोर पक्षाची अधिकृत भूमिका मांडतात. मात्र शिवसेनेत गेल्या काही दिवसांपासून प्रवक्त्यांची भूमिकाच पक्षाला अडचणीत आणणारी ठरत होती. यापार्श्वभूमीवर शुक्रवारी शिवसेनेने खांदेपालट करण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी शिवसेनेने सहा नवीन प्रवक्त्यांची यादी जाहीर केली आहे. नीलम गो-हे वगळता उर्वरीत प्रवक्ते हे तरुण व नवीन चेहरे आहेत. यामध्ये अमोल कोल्हे, अरविंद सावंत, अरविंद भोसले, डॉ. मनिषा कायंदे, विजय शिवतारे यांना प्रवक्तेपद देण्यात आले आहे.
भोसलेंना लॉटरी
नारायण राणे यांचा पराभव होईपर्यंत चप्पल घालणार नाही अशी शपथ घेणारे वरळीतील शाखाप्रमुख अरविंद भोसले यांना थेट पक्षाच्या प्रवक्तेपदाची लॉटरी लागली.