शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
2
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
3
छत्तीसगडमध्ये 27 नक्षलवाद्यांचा खात्मा; पीएम नरेंद्र मोदींनी केले सुरक्षा दलांचे कौतुक; म्हणाले...
4
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
5
'जगाची दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलाय', 'त्या' आरोपांवरून भारताने तिखट शब्दात सुनावले
6
MI vs DC : अक्षर पटेल का नाही?; फाफ म्हणाला. मागच्या दोन दिवसांपासून तो....
7
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू
8
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये
9
Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
10
मुंबईतील कामचुकार कंत्राटदारांना बसणार मोठ्ठा दणका! पालकमंत्री शेलारांनी दिले महत्त्वाचे आदेश
11
Video: जुळ्या बहिणींचे जुळ्या भावांसोबत लग्न; व्हिडिओ पाहून चक्रावून जाल...
12
ऑपरेशन सिंदूर’च्या शौर्याबद्दल सैन्याचे अभिनंदन, पण 'त्या' प्रश्नांच्या उत्तरांचं काय?- काँग्रेस
13
'वक्फ इस्लामचे अविभाज्य अंग नाही, ते धर्मादाय संस्थेसारखे', सुप्रीम कोर्टात केंद्राने मांडली बाजू
14
जपानमध्ये तांदळावर कृषीमंत्र्यांनी असं काय म्हटलं?; ज्याने द्यावा लागला मंत्रिपदाचा राजीनामा
15
नव्या गर्लफ्रेंडची साथ मिळताच शिखर धवनने घेतला आलिशान बंगला; किंमत ऐकून बसेल धक्का
16
गुरुवारी गजकेसरी योग: ८ राशींवर लक्ष्मी कृपा, अपार गुरुबळ; बक्कळ लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
17
कोण म्हणतं वय झालं? ८६ आणि ८४ वर्षांच्या दोन बहिणींनी ठरवलं जग पहायचं, आणि निघाल्या..
18
सैफुल्लाहच्या शोकसभेत भारताविरोधात ओकली गरळ; पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा उघड
19
Coronavirus: धोक्याची घंटा! कोरोना पाठ सोडेना, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
20
"अजितदादा, तुम्ही पदाधिकाऱ्याला वाचवणार की वैष्णवीला न्याय देणार?", सुषमा अंधारे संतापल्या

'देशद्रोह स्वस्त झालाय, भाजपशासित राज्यांमध्ये काहीही केले तरी गुन्हा दाखल होतो'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 12:18 IST

कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. त्यावरुन संजय राऊत यांनी भाजपर टीका केली आहे.

मुंबई: काही दिवसांपूर्वी कर्नाटकातछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. त्या घटनेचे महाराष्ट्रातही मोठे पडसाद उमटले. दरम्यान, त्या घटनेचा निषेध करणाऱ्या बेळगावातील तरुणांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्या प्रकरणावरुन शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

भाजपशासित राज्यात देशद्रोहाचे गुन्हेशिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विंटबना केल्याचा निषेध व्यक्त करणे देशद्रोह कसा असू शकतो? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. केवळ राजकारणासाठी शिवरायांचा वापर करू नका, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. देशद्रोह खूप स्वस्त झालाय. भाजपशासित राज्यात काहीही केलं तरी देशद्रोहाचा गुन्हा दाखल होतो. महाराष्ट्रात या गुन्ह्याबद्दल आवाज उठवणे गरजेचे आहे,  असे संजय राऊत म्हणाले.

छत्रपती कोण होते माहिती नाही का...?राऊत पुढे म्हणाले की, बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे 38 तरुण तुरुंगात आहेत. त्यांच्यावर देशद्रोह गुन्हा दाखल केलाय. त्यांचा गुन्हा एवढाच की, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अपमानाचा निषेध केला. छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे तुम्हाला माहित नाही का? एका बाजूला काशीमध्ये नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा पुरस्कार करतात आणि त्याच पक्षाच्या राज्यात छत्रपतींचा अपमान होतो, असा टीका राऊतांनी केली. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतKarnatakकर्नाटकShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजBJPभाजपा