शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मासुर्डीच्या व्यथा वाचून धावून आले खासदार संजय काकडे !

By admin | Updated: March 26, 2016 00:29 IST

घागरभर पाण्यासाठी चिंताग्रस्त असलेल्या मासुर्डी गावाची कहाणी ‘लोकमत’ने प्रकाशित करताच, खासदार संजय काकडे यांनी या ग्रामस्थांच्या दु:खावर फुंकर घालताना मासुर्डी हे गाव

औसा (जि. लातूर) : घागरभर पाण्यासाठी चिंताग्रस्त असलेल्या मासुर्डी गावाची कहाणी ‘लोकमत’ने प्रकाशित करताच, खासदार संजय काकडे यांनी या ग्रामस्थांच्या दु:खावर फुंकर घालताना मासुर्डी हे गाव दत्तक घेत असल्याची घोषणा केली़ ‘लोकमत’मुळेच गावची समस्या समजली असून, आता गावाला महाराष्ट्रातील एक आदर्श व मॉडेल गाव बनवू या, अशी हाक देत गावातील विविध विकासकामांसाठी ५० लाख रुपये देण्याची घोषणाही केली़ औसा तालुक्यातील मासुर्डी हे अडीच हजार लोकसंख्येचे गाव़ आॅक्टोबर २०१४पासून येथे भीषण पाणीटंचाई आहे़ लोकमत चमूने २४ तास गावात राहून ‘आॅन द स्पॉट रिपोर्ट’द्वारे तेथील पाण्याचे दुर्भिक्ष सर्वांसमोर आणले़ हे सर्व वृत्तांकन राज्यसभा सदस्य संजय काकडे यांनी वाचले व ते अस्वस्थ झाले. त्यांनी आपण हे गाव दत्तक घेऊन, या गावाला आदर्श गाव बनविण्याचा संकल्प केला. गुरुवारी मासुर्डीला येऊन त्यांनी तशी घोषणाही केली. त्यांच्यासमवेत माजी आमदार पाशा पटेल, आमदार बच्चू कडू व अन्य राजकीय नेते व प्रशासकीय अधिकारी होते. खा. काकडे यांनी गावातील टंचाईस्थितीची पाहणी केली. गावकऱ्यांशी संवाद साधला. मासुर्डी गावची परिस्थिती पाहून त्यांचे मन सुन्न झाले.मासुर्डीला आदर्श मॉडेल बनविणार : खा. काकडे आतापर्यंत औसा तालुक्यातील ३७ गावांना ९ कोटी ६६ लाख रुपयांचा निधी जलसंधारणाच्या कामांसाठी दिला आहे़ आता हे ३८वे गाव आहे़ हे गावच दत्तक घेतल्यामुळे या गावात सर्व कामे करून महाराष्ट्रात आदर्श ठरेल असे ‘मॉडेल गाव’ उभा केले जाईल. हा ‘पायलट प्रोजेक्ट’ म्हणून राज्याने पाहावा, असे खा. काकडे म्हणाले.‘लोकमत’वर कौतुकाचा वर्षाव... : प्रत्येक मान्यवराने आपल्या भाषणात ‘लोकमत’मधील वृत्तांकनाचा आवर्जून उल्लेख केला़ लातूर आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या या गावचे भीषण संकट राज्याच्या समोर आणल्याने आम्हाला गावच्या परिस्थितीची माहिती मिळाली, असे सांगून खा. संजय काकडे यांनी ‘लोकमत’चे कौतुक केले़