शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

...तर संजय दत्तला पुन्हा बेलाशक तुरुंगात पाठवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 04:56 IST

अभिनेता संजय दत्त याने पॅरॉल, फर्लो आणि रेमिशन अशा सर्व सवलतींसह शिक्षा भोगून पूर्ण केली आहे याची पूर्ण खात्री करून घेतल्यानंतरच त्याला तुरुंगातून सोडण्यात आले आहे.

विशेष प्रतिनिधी ।मुंबई: अभिनेता संजय दत्त याने पॅरॉल, फर्लो आणि रेमिशन अशा सर्व सवलतींसह शिक्षा भोगून पूर्ण केली आहे याची पूर्ण खात्री करून घेतल्यानंतरच त्याला तुरुंगातून सोडण्यात आले आहे. त्याला ठरलेल्या शिक्षेहून एकही दिवस आधी मुक्त केले गेलेले नाही. तरीही आम्ही लावलेले नियम व भोगलेल्या शिक्षेचा केलेला हिशेब चुकीचा आहे असे वाटत असेल तर संजय दत्तला जरूर पुन्हा तुरुंगात पाठवा. आमची त्यास मुळीच हरकत नाही, अशी ठाम भूमिका राज्य सरकारने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात मांडली.संजय दत्तला झुकते माप देत सरकारने नियमबाह्य पद्धतीने मुदतीआधीच सोडले, असा आरोप करणाºया जनहित याचिकेवर न्या. राजेंद्र सावंत व न्या. साधना जाधव यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. सरकारने आपले म्हणणे मांडणारे प्रतिज्ञापत्र याआधीच केले आहे. त्या अनुषंगाने युक्तिवाद करताना अ‍ॅडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी यांनी वरीलप्रमाणे भूमिका मांडली. याआधी सरकारला धारेवर धरणारे न्यायमूर्ती हे ऐकून काहीसे अचंबित झाले व त्यांनी, संजय दत्तला पुन्हा तुरुंगात पाठवायला हवे, असे आमचे म्हणणे नाही. नियमांचे नीट पालन झाल्याची खात्री करून घेणे हे आमचे काम आहे.संजय दत्तला फर्लो, पॅरॉल आणि रेमिशन या प्रकारे किती व कशा सवलती दिल्या गेल्या, त्याचा हिशेब कसा केला गेला आणि ते करताना कोणकोणते नियम लावले गेले याचा सविस्तर तपशिल देणारा तक्ता अ‍ॅडव्होकेट जनरलनी सादर केला.संजूबाबाचे लागोपाठ दोन अर्जसंजय दत्तच्या सुट्टीसाठीचे दोन्ही अर्ज मंजूर करण्यात आले. सामान्य कैद्यांच्या बाबतीत अशीच तत्परता दाखवतात का, असा न्यायमूर्तींचा प्रश्न होता. यावर त्यांनी सरकारला अधिक खुलासा करण्यास सांगितले.कुंभकोणी म्हणाले की, सरकार कैद्याला नियमांहून एक दिवसही आधी सोडू शकत नाही तसेच शिक्षा भोगून पूर्ण झाल्यावर एकही जास्त दिवस तुरुंगात ठेवू शकत नाही. संजय दत्तसारख्या ‘हाय प्रोफाईल’ कैद्याच्या बाबतीत या दोन्ही बाबींची खात्री करून मगच त्याला सोडले.त्यामुळे सुटकेआधी संजय दत्तला काही रात्री जशी झोप आली नसेल तसेच सुटकेची जबाबदारी असलेल्या तुरुंग अधिकाºयांनीी घेतलेला निर्णय योग्य असल्याची पक्की खात्री करण्यासाठी अनेक रात्री जागविल्या, यावरही त्यांनी भर दिला.