शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतागृहातच अस्वच्छता

By admin | Updated: July 19, 2016 01:00 IST

स्वच्छतागृहाच्या देखभालीकडे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे प्रवाशांची, विशेषत: महिलांची कुचंबणा होत आहे.

कोथरूड : पौडर स्त्यावरील वनाझ कंपनीजवळ असलेल्या स्वच्छतागृहाच्या देखभालीकडे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे प्रवाशांची, विशेषत: महिलांची कुचंबणा होत आहे.मुंबई, कोकण, मुळशी-मावळ भागाकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी उभारलेल्या एसटी व खासगी प्रवासी बसथांब्यानजीक महापालिकेचे स्वच्छतागृह आहे. या स्वच्छतागृहामुळे प्रवाशांबरोबरच लोकमान्य झोपडपट्टीमधील महिलांचीही सोय झाली होती; परंतु गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ महिला स्वच्छतागृहाची वीज बंद आहे. स्वच्छतागृहात नळ नसल्याने मोठी अस्वच्छता व दुर्गंधी पसरलेली आहे. दारूच्या बाटल्या व तत्सम कचरा स्वच्छतागृहात पडलेला आहे. मुख्य रस्त्यावर असूनही या स्वच्छतागृहाच्या स्वच्छतेकडे व देखभालीकडे महापालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करण्यास धजावतातच कसे, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते अविनाश दंडवते यांनी उपस्थित केला. दंडवते म्हणाले, ‘‘येथील बसथांबा नोकरदार व प्रवाशांनी नेहमीच गजबजलेला असतो. स्वच्छ स्वच्छतागृह उपलब्ध करुन देणे, हे महापालिकेचे कर्तव्य आणि नागरिकांचा अधिकार आहे. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करून महापालिकेने नागरिकांना सुविधांपासून वंचित ठेवले आहे.’’ (वार्ताहर)स्मार्ट पुणे करायला निघालेल्या आयुक्तांनी एकदा या स्वच्छतागृहालाही भेट द्यावी. आम्हाला दुय्यम वागणूक देण्याचाच हा प्रकार आहे. विजेची सुविधा नाही, नळ नाही, अस्वच्छता यांमुळे आमची कुचंबणा होत आहे. व्हेंटिलेशनची सोय नसल्याने दुर्गंधीचा सामना करावा लागतो. - श्रावणी शिंदे, प्रवासी