शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

शाळा, शौचालयांमध्ये सॅनिटरी नॅपकीन

By admin | Updated: June 3, 2016 03:14 IST

पालिका शाळा व सार्वजनिक शौचालयांमध्ये सॅनिटरी नॅपकीन वेंडिंग मशीन लावण्याचा निर्धार शिवसेनेने दोन वर्षांपूर्वी केला होता़ भाजपाने मात्र ही मशीन लवकरच शाळा

मुंबई : पालिका शाळा व सार्वजनिक शौचालयांमध्ये सॅनिटरी नॅपकीन वेंडिंग मशीन लावण्याचा निर्धार शिवसेनेने दोन वर्षांपूर्वी केला होता़ भाजपाने मात्र ही मशीन लवकरच शाळा, प्रसूतिगृह व सार्वजनिक शौचालयांमध्ये बसविण्यात येणार असल्याची गुरुवारी घोषणा करीत याचे श्रेय आपल्या खात्यावर जमा केले़पालिकेच्या आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मित्रपक्षामध्ये चढाओढ सुरू आहे़ २०१४ मध्ये शिवसेनेचे राहुल शेवाळे यांनी पालिका शाळेत, गलिच्छ वस्तींमधील महिलांसाठी ही सुविधा उपलब्ध करण्याची घोषणा केली होती़ मात्र भाजपाने आता हा प्रकल्प हायजॅक केला आहे़ या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन अतिरिक्त आयुक्त आय़ए़ कुंदन यांनी दिले असल्याचा दावा भाजपाने केला आहे़ गरीब व मध्यमवर्गीय महिलांना विविध कंपन्यांचे सॅनिटरी नॅपकीन आर्थिकदृष्ट्याही परवडत नाहीत़ तसेच विल्हेवाट लावण्याची सोय नसल्याने वापरलेले सॅनिटरी नॅपकीन शौचालयांमध्येच टाकण्यात येतात़ यामुळे मलनिस्सारण वाहिनी तुंबते़ म्हणून ही स्वयंचलित मशीन इन्सिनेटरच्या सुविधेसह असेल, अशी माहिती महिला व बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा राजश्री शिरवाडकर यांनी आज दिली़ शिरवाडकर भाजपाच्या नगरसेविका आहेत़ (प्रतिनिधी)