शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

सॅनिटरी नॅपकिन जीएसटीतून वगळा - अमृता फडणवीस

By admin | Updated: June 1, 2017 03:33 IST

महिला बचतगटांमार्फत बनविल्या जाणाऱ्या सॅनिटरी नॅपकिनला वस्तू व सेवा कर (जीएसटी) लावू नये, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महिला बचतगटांमार्फत बनविल्या जाणाऱ्या सॅनिटरी नॅपकिनला वस्तू व सेवा कर (जीएसटी) लावू नये, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केली. अमृता फडणवीस यांनी गायलेल्या ‘फिर से’ या गाण्याच्या चित्रीकरणाचा विशेष खेळ बुधवारी मुंबईत बिग बी अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत पार पडला. टी सीरिजने या गाण्याची निर्मिती केली आहे. अमृता फडणवीस या स्वत: कार्पोरेट क्षेत्रात कार्यरत असून, त्यांना गाण्याची आवड आहे. त्यांनी आतापर्यंत १४ शास्त्रीय आणि भक्तिगीते गायली आहेत. ‘फिर से’ या गीतात मात्र त्यांनी अभिनय आणि नृत्यही केले आहे. एका सामाजिक उद्देशाने या गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले आहे. कोणत्याही चित्रपटात काम करण्याची आपली इच्छा नसल्याचेही अमृता फडणवीस यांनी या वेळी स्पष्ट केले. अमिताभ बच्चन म्हणाले की, अमृता फडणवीस या महिला सक्षमीकरण आणि सामाजिक कार्यात पुढाकार घेत आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या गीतात काम केले आहे. या गाण्याच्या माध्यमातून मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नातील निम्मा हिस्सा शेतकरी साहाय्यता निधीसाठी देणार असल्याचे टी सिरीज कंपनीने जाहीर केले आहे.