शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत तरुणावर खुनीहल्ला हत्यार सापडले; जखमी गायब; हल्लेखोरही पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 22:54 IST

आपटा पोलिस चौकीजवळ एका तरुणावर खुनीहल्ला करण्यात आला. यामध्ये हा तरुण जखमी झाल्याने त्याने स्वत:च्या बचावासाठी तेथून पलायन केले.

सांगली : येथील आपटा पोलिस चौकीजवळ एका तरुणावर खुनीहल्ला करण्यात आला. यामध्ये हा तरुण जखमी झाल्याने त्याने स्वत:च्या बचावासाठी तेथून पलायन केले. रविवारी सायंकाळी ही घटना घडली. विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. हल्ला करण्यासाठी वापरलेले हत्यार सापडले; पण रात्री उशिरापर्यंत जखमीचा तसेच हल्लेखोरांचा शोध लागला नव्हता. माळी कामासाठी वापरण्यात येणाºया मोठ्या कात्रीने तिघांच्या टोळीने तरुणावर हल्ला केला. त्याच्या चेहºयावर वार बसल्याने तो रक्तबंबाळ झाला. बचावासाठी त्याने तेथून काळी खणीजवळ असलेल्या खोक्यांकडे पलायन केले. नागरिकांनी गर्दी झाल्याने हल्लेखोर आपटा पोलिस चौकीजवळील मिनी बसमागे लपून बसले. जखमी तेथून कर्मवीर चौकाकडे गेला. नागरिकांनी विश्रामबाग पोलिसांना याची माहिती दिली. पोलिस तातडीने दाखल झाले. तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले होते. घटनास्थळी हल्ला करण्यासाठी वापरलेली कात्री पडली होती. ती जप्त करण्यात आली आहे. जखमीचा पोलिसांनी कर्मवीर चौक परिसरात शोध घेतला. पण तो सापडला नाही. शासकीय रुग्णालयातही चौकशी करण्यात आली. मात्र तिथेही तो उपचारासाठी दाखल झाला नव्हता. खासगी रुग्णालयातूही तो उपचारार्थ दाखल असल्याची नोंद पोलिसांकडे आली नाही. त्यामुळे जखमीचे नाव? हल्ला कोणी केला व कशासाठी केला? याचा सविस्तर तपशील मिळू शकला नाही.