शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सांगली, तासगाव, कवठेमहांकाळ शोकसागरात

By admin | Updated: February 16, 2015 23:26 IST

आबांच्या निधनाने राष्ट्रवादी सुन्न : तासगावात व्यवहार बंद, कार्यकर्त्यांना अश्रू अनावर, जिल्ह्यात सन्नाटा

सांगली/तासगाव/कवठेमहांकाळ : माजी उपमुख्यमंत्री रावसाहेब रामराव तथा आर. आर. पाटील यांच्या निधनाचे वृत्त सोमवारी सायंकाळी समजताच सांगली जिल्हा सुन्न झाला. सांगली शहरासह तासगाव, कवठेमहांकाळ, ढालगाव परिसरात शोककळा पसरली. तासगावातील मार्केट कमिटीमधील त्यांच्या कार्यालयासमोर कार्यकर्ते धाय मोकलून रडत होते. शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवून आबांना आदरांजली वाहण्यात आली. अंजनीतील त्यांच्या निवासस्थानासमोर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. एकमेकांचे सांत्वन करताना कार्यकर्त्यांना आपल्या भावना अनावर झाल्या होत्या. कवठेमहांकाळमध्ये सन्नाटा पसरला होता. आज दुपारी एकच्या सुमारास आबांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त जिल्ह्यात धडकले होते. तेव्हापासून सर्वच पक्षांतील कार्यकर्ते दूरध्वनीवरून एकमेकांशी संपर्क साधून विचारपूस करीत होते. अखेर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दूरचित्रवाहिन्यांवरून त्यांच्या निधनाचे वृत्त पसरताच अनेकांनी आक्रोश केला. सांगलीतील राष्ट्रवादी कार्यालयात सन्नाटा पसरला होता. सकाळपासून जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांची रुपरेषा ठरविण्यात कार्यकर्ते मग्न होते. पण सायंकाळी आबांच्या निधनाचे वृत्त येताच राष्ट्रवादीत शोककळा पसरली. शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, महापालिकेतील विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, सचिव मनोज भिसे राष्ट्रवादी कार्यालयात थांबून कार्यकर्त्यांचे सांत्वन करीत होते. राष्ट्रवादीने या आठवडाभरातील सर्वच कार्यक्रम रद्द केले.तासगाव : आर. आर. पाटील यांच्या निधनाचे वृत्त समजताच तासगाव तालुक्यावर शोककळा पसरली. आर. आर. पाटील यांच्यावर दोन-तीन महिन्यांपासून मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू असल्यामुळे तालुक्यातले त्यांचे कार्यकर्ते, सामान्य नागरिक सतत त्यांच्या तब्येतीची चौकशी करीत होते. अखेर आज त्यांनी शेवटचा श्वास घेतल्याचे कळताच, त्यांच्या कार्यकर्त्यांना दु:ख अनावर झाले. तासगावातील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात सुरूवातीपासून असलेल्या त्यांच्या कार्यालयात कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. बाजार समितीमधील कार्यालयापुढे येताच कार्यकर्त्यांना अश्रू अनावर होत होते. आबांच्या जाण्याने त्यांना जबरदस्त धक्का बसल्याचे चित्र होते. कार्यकर्त्यांचे हुंदके मन हेलावणारे होते. एकमेकांना आधार देत कार्यकर्ते सावरण्याचा प्रयत्न करत होते. तालुक्यात दुपारी ४.३० च्या दरम्यान आबांच्या निधनाचे वृत्त समजल्यापासून कार्यकर्ते सैरभैर झाले. सकाळी १०-११ वाजल्यापासून त्यांची प्रकृती चिंताजनक बनल्याची चर्चा सुरू झाली, तशी आबांच्या कार्यालयात कार्यकर्त्यांनी गर्दी करायला सुरूवात केली होती. सकाळपासून कार्यकर्ते कार्यालयात बसून होते व मुंबईशी संपर्क ठेवून होते. क्षणा-क्षणाला त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत होते. दुपारनंतर त्यांची प्रकृती गंभीर, परंतु स्थिर असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितल्यावर कार्यकर्त्यांना धीर आला होता. प्रकृती स्थिर असल्याचे समजताच काहीसे समाधानही त्यांच्या चेहऱ्यावर होते. मात्र कान मुंबईकडेच होते. अखेर नको असणारा क्षण आलाच. वृत्तवाहिन्यांवर त्यांच्या निधनाचे वृत्त येताच कार्यकर्ते बाजार समितीच्या दिशेने येत होते. तसेच तासगावातील दुकाने बंद झाली. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून आबांना आदरांजली अर्पण केली. एकंदरीत तासगाव शोकसागरात बुडाल्याचे चित्र होते. बाजार समितीमधील बेदाणा सौदे बंद करण्यात आले. परिसर सुन्न-सुन्न झाला. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दु:खाची छटा स्पष्ट दिसत होती. आबांच्या कारकीर्दीच्या पहिल्या दिवसापासून त्यांच्याबरोबर असणारे त्यांचे कार्यकर्ते अस्वस्थ होते. एकमेकांच्या गळ्यात पडून ते रडत होते. (प्रतिनिधी)व्यवहार बंद ठेवून आदरांजलीकवठेमहांकाळ तालुक्यावर शोककळा पसरली असून, तालुक्यातील गावांमध्ये सर्व व्यवहार बंद ठेवून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. कवठेमहांकाळ शहरात बातमी समजताच शहरात सर्वपक्षीय कार्यकर्ते जमा झाले. शहरातील शिवरात्र उत्सव रद्द करण्यात आला. त्यानिमित्ताने ठेवण्यात आलेले सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. विविध ठिकाणी लावण्यात आलेली डिजिटलही उतरवण्यात आली. लहान बालकांपासून अबाल-वृद्ध आबांच्या निधनाने शोक व्यक्त करीत होते.मंगळवार, दि. १७ रोजी सर्वपक्षीय शोकसभा घेण्यात येणार असून, शहरातील सर्व व्यवहार व आठवडा बाजार बंद राहणार आहेत.