शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : बंगला फोडून 15 तोळे दागिने,लाखोच्या रोकडवर डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 19:52 IST

हरिपूर (ता. मिरज) येथील अशोक दत्तात्रय जोशी यांचा ‘पारिजात’ हा बंगला फोडून चोरट्यांनी १५ तोळे सोन्याचे दागिने, एक लाखाची रोकड असा एकूण साडेपाच लाखांचा ऐवज लंपास केला.

सांगली, दि. 13 -  हरिपूर (ता. मिरज) येथील अशोक दत्तात्रय जोशी यांचा ‘पारिजात’ हा बंगला फोडून चोरट्यांनी १५ तोळे सोन्याचे दागिने, एक लाखाची रोकड असा एकूण साडेपाच लाखांचा ऐवज लंपास केला. रविवारी पहाटे चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.हरिपूरमध्ये विनायकनगरमधील लक्ष्मी कॉलनीत अशोक जोशी यांचा बंगला आहे. चार दिवसापूर्वी ते कुटूंबासह मुंबईला गेले होते. मध्यंतरीच्या काळात चोरट्यांनी त्यांच्या बंगल्या उत्तरेकडील बाजूच्या खिडकीचे गज कापून आत प्रवेश केला. बेडरुममधील कपाटाचा लॉक तोडला. त्यामधील साहित्य विस्कटून टाकले. लॉकरमधील सोन्याच्या चार जोड बांगल्या, तीन जोड मंगळसूत्र, चार जोड रिंगा, पाच अंगठ्या असा एकूण साडेपाच लाखांचा ऐवज लंपास केला. जोशी कुटूंब रविवारी पहाटे मुंबईहून घरी परतले. घरात गेल्यानंतर त्यांना बेडरुमधील विस्कटलेले साहित्य पाहून चोरी झाल्याचा संशय आला. तसेच लॉकरमध्ये दागिने व रोकडही नव्हती. बंगल्याभोवती संरक्षक भिंत आहे. या भिंतीवरुन उड्या मारुन चोरट्यांनी बंगल्यात प्रवेश केल्याची शक्यता आहे. ग्रामीण पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते. महत्वाचे ठसे मिळाले आहेत. श्वान बंगल्यापासून काही अंतरावर गेले. तिथेच ते घुटमळले. दुपारी अशोक जोशी यांची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हेगारांनी पाळत ठेऊन चोरी केल्याचा संशय आहे. दुसरी घरफोडी-महिन्यापूर्वी हरिपूरच्या विनायकनगर परिसरात चोरट्यांनी अलिशान बंगला फोडून २० तोळे सोन्याचे दागिने, चांदीची भांडी, देवांच्या मूर्ती व रोकड असा २१ लाखांचा ऐवज लंपास केला होता. या घटनेचा अजूनही छड लागलेला नाही. तोपर्यंत चोरट्यांनी आणखी एक बंगला फोडून पोलिसांना एकप्रकारे आव्हानच दिले आहे.