शहरं
Join us  
Trending Stories
1
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
2
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
4
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
5
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
6
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
7
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
8
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
9
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
10
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
11
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
12
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
13
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
14
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
15
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
16
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
17
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
18
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
19
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
20
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले

सांगलीत शेतक-यांना पोलिसांकडून मारहाण, जबरदस्तीने व्हॅनमध्ये कोंबले

By admin | Updated: June 7, 2017 13:19 IST

शेतक-यांच्या संपादरम्यान आज सकाळी स्थानबद्ध केलेल्या कार्यकर्त्यांना बाहेरगावी हलविताना पोलिसांनी बळाचा वापर केला.

ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 07 -  शेतक-यांच्या संपादरम्यान आज सकाळी स्थानबद्ध केलेल्या कार्यकर्त्यांना बाहेरगावी हलविताना पोलिसांनी बळाचा वापर केला. आठ कार्यकर्त्यांना जबरदस्तीने पोलिसांच्या व्हॅनमध्ये कोंबले. त्यांना व्हॅनमध्ये मारहाण झाली. यात किसान सभेच्या उमेश देशमुख यांच्या बोटाला दुखापत झाली.
सांगलीत शेतक-यांच्या संपादरम्यान सर्वपक्षीय कार्यकर्ते सकाळी भाजीमंडईत बाजार बंद करण्यास जाणार होते. मात्र पोलिसांनी तत्पूर्वीच सकाळी सहाच्यादरम्यान त्यांना ताब्यात घेतले. सर्व कार्यकर्त्यांना विश्रामबाग पोलिस ठाण्यात आणण्यात आले. हे समजताच पोलीस ठाण्यात आणखी कार्यकर्ते जमा झाले. दुपारी बारा वाजताच्या सुमारास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते महेश खराडे, सुधार समितीचे अ‍ॅड. अमित शिंदे, किसान सभेचे कॉ. उमेश देशमुख, हमाल पंचायतीचे विकास मगदूम, जनता दलाचे शशिकांत गायकवाड, अश्रफ वांकर यांच्यासह आठ जणांना पोलिसांनी बाहेरगावी हलविण्याचे ठरविले. मात्र कार्यकर्त्यांनी विरोध करताच पोलिसांनी बळाचा वापर केला.
पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील यांच्यासह पोलिसांनी आठ आंदोलकांना ओढत नेऊन पोलिसांच्या व्हॅनमध्ये कोंबले. शिवाय व्हॅनमध्ये मारहाण झाली. यात किसान सभेच्या उमेश देशमुख यांच्या बोटाला दुखापत झाली. त्यानंतर सर्वांना तासगाव पोलिस ठाण्याकडे रवाना करण्यात आले. हे वृत्त समजताच वकिलांसह विविध संघटनांच्या कार्यर्त्यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्याकडे धाव घेतली.