शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यात ७१%मतदान

By admin | Updated: February 22, 2017 01:10 IST

महिलांचा टक्का वाढला : ५९० उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद; खेडमध्ये महिलेचा मृत्यू

सांगली : जिल्हा परिषदेच्या ६० जागांसाठी २२५, तर पंचायत समितीच्या ११८ जागांसाठी ३६७ अशा ५९० उमेदवारांचे भवितव्य मंगळवारी मतदान यंत्रात बंद झाले. जिल्ह्यात जतमध्ये सहा ठिकाणी मारामारी झाली, तर मिरज तालुक्यातील हरिपूर, तुंग येथे आणि तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी, जरंडीत वादावादी झाली. खेड (ता. शिराळा) येथे मतदानास येताना एका महिलेचा मृत्यू झाला. सरासरी ७१.२४ टक्के मतदान झाले. गुरुवार, दि. २३ रोजी मतमोजणी होणार आहे.जिल्ह्यात पंचायत समितीच्या दोन जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. मंगळवारी १६ लाख ३ हजार १४७ पैकी ११ लाख ४२ हजार १०२ मतदारांनी १ हजार ८२४ मतदान केंद्रांवर मतदान केले. याची टक्केवारी ७१.२४ टक्के आहे. सकाळच्या पहिल्या दोन तासात संथगतीने नऊ टक्के मतदान झाले होते. साडेनऊनंतर मतदानासाठी गर्दी होऊ लागली. दुपारी दीडपर्यंत ३८.२८, तर दुपारी साडेतीनपर्यंत ५३.४९ टक्के मतदान झाले. चारनंतर मतदानासाठी रांगा लागल्याने कडेगाव, पलूस, वाळवा, मिरज, जत, तासगाव तालुक्यात वेळ संपल्यानंतरही मतदान झाले. पलूसमध्ये सर्वाधिक ८०.८३ टक्के, तर वाळवा तालुक्यात ६७.४६ सर्वात (पान ९ वर)जतमध्ये सहा ठिकाणी मारामारीतुंग, डोंगरसोनी, हरिपूर, जरंडीत वादावादीकवठेपिरान, दुधोंडीत मतदान यंत्रात बिघाडसांगली जिल्ह्यात मंगळवारी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी चुरशीने मतदान झाले. इनाम धामणी येथील शेतकरी कुटुंबाने बैलगाडीतून येऊन मतदानाचा हक्क बजावला.