शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत कृषी प्रदर्शनाचा मंडप कोसळला

By admin | Updated: January 17, 2015 00:06 IST

आंबेडकर क्रीडांगणातील घटना : पंधराजण जखमी; संयोजकांसह दोघांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सांगली : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर भरविण्यात आलेल्या कृषी व पशु प्रदर्शनाचा मंडप कोसळल्याने प्रदर्शन पाहण्यास आलेले १५ लोक जखमी झाले. आज, शुक्रवारी सकाळी अकराला ही घटना घडली. याप्रकरणी प्रदर्शनाचे संयोजन राजेश शहा (रा. इंद्रप्रस्थनगर) व मंडप व्यावसायिक सुनील माळी (कलानगर, सांगली) यांच्याविरुद्ध दुसऱ्याच्या जीवितास धोका निर्माण होईल असे कृत्य केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जखमींमध्ये सुभान इकबाल पटेल (वय २२, रा. पद्माळे), श्रीपाल गोपाळराव आचार्य (५०, रा, माधवनगर, ता. मिरज), अजिंक्य प्रकाश पवार (२२, सावर्डे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांच्यासह अन्यजणांचा समावेश आहे. जखमींवर विविध खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर प्रदर्शनात प्रचंड गोंधळ आणि आरडाओरड सुरु झाली होती. घटनास्थळी शासकीय व खासगी रुग्णवाहिका दाखल झाल्या होत्या. मदतकार्यासाठी पोलिसांचाही फौजफाटा मोठ्या प्रमाणात दाखल झाला होता. जखमी श्रीपाल आचार्य यांची फिर्याद घेऊन पोलिसांनी शहा व माळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ‘रिसोर्सेस’तर्फे दि. १५ ते १८ जानेवारीदरम्यान प्रदर्शन भरविण्यात आले आहे. प्रदर्शनात तीन मोठे मंडप उभे केले आहेत. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे प्रदर्शन सुरु होते. त्यावेळी स्टेडियमच्या मुख्य प्रवेशद्वारापासून प्रवेश करण्यात येणाऱ्या स्टॉलचा मंडप अचानक कोसळला. स्टॉलमध्ये वाहने असल्याने मंडपाचा पत्रा, काठ्या व लोखंडी अँगल त्यावर पडले. स्टॉलमध्ये पन्नासहून अधिक लोक होते. त्यांच्या अंगावरही पत्रे पडले. एका जखमीच्या खांद्यात पत्रा घुसला आहे. घटनास्थळी तातडीने मदत मिळाल्याने अडकलेल्यांना बाहेर काढण्यात यश आले. (प्रतिनिधी)पावसाची शक्यता असल्याने पत्र्याचा मंडप उभारण्यात आला होता. वाऱ्यामुळे हा मंडप कलून पाच फूट खाली आला. यामुळे २० ते २५ स्टॉलधारकांना याचा फटका बसला. यामध्ये तिघे जखमी झाले. त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्यात आले आहेत. आता याठिकाणी कापडी मंडपाची उभारणी केली आहे.- राजेश शहासंयोजक, कृषी प्रदर्शनजिल्हा परिषदेची शहांना नोटीस राजेश शहा यांनी कृषी प्रदर्शनात जिल्हा परिषद सांगली असा उल्लेख केला असून हा कायदेशीर गुन्हा आहे. याप्रकरणी तुमच्यावर फौजदारी कारवाई का करू नये, अशी नोटीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी राजेश शहा यांना पाठविली आहे. नोटिसीला उत्तर आल्यानंतर शहा यांच्यावर पुढील कारवाई होणार असल्याचेही सतीश लोखंडे यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण भाड्याने न देण्याबाबत मनपाने ठराव केला असल्याबाबत पत्रकारांनी विचारले असता आयुक्त अजिज कारचे यांनी, घडलेल्या दुर्घटनेची माहिती घेण्यात येईल व त्यानंतरच निर्णय घेणार असून भविष्यात प्रदर्शन भरविण्यासाठी मोकळ्या जागेची सुविधा उपलब्ध करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.