शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

संघ स्वयंसेवकांना दसऱ्याला फुलपॅन्ट नक्की!

By admin | Updated: August 21, 2016 01:28 IST

दसऱ्याला होणाऱ्या संचलनासाठी संघ स्वयंसेवकांना फुलपॅन्ट देण्याचा मुक्रर झालेला मुहूर्त साधण्यासाठी लगीनघाई सुरू आहे. नवा गणवेश कसा असेल याबाबत स्वयंसेवकांची प्रतीक्षा

- योगेश पांडे, नागपूर

दसऱ्याला होणाऱ्या संचलनासाठी संघ स्वयंसेवकांना फुलपॅन्ट देण्याचा मुक्रर झालेला मुहूर्त साधण्यासाठी लगीनघाई सुरू आहे. नवा गणवेश कसा असेल याबाबत स्वयंसेवकांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. या आठवड्यात संघाचा नवा गणवेश संघ मुख्यालयात पोहोचणार आहे. नागपूर महानगरातील स्वयंसेवकांची संख्या लक्षात घेता गणवेशांची संख्या अपुरी पडणार आहे. हीच बाब लक्षात घेऊन आता स्थानिक पातळीवरही गणवेश बनविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. बदलत्या काळाप्रमाणे संघाच्या गणवेशातदेखील बदल झाले पाहिजेत, असा मतप्रवाह होता. संघाने बऱ्याच विचाराअंती गणवेशामध्ये बदल केला. मार्चमध्ये राजस्थान येथील नागौर येथे झालेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेदरम्यान संघातर्फे याची घोषणा करण्यात आली होती. गणवेशातील खाकी ‘हाफपॅन्ट’च्या ऐवजी तपकिरी रंगाच्या ‘फुलपॅन्ट’चा समावेश करण्यात आला. नव्या गणवेशासाठी विजयादशमीचा मुहूर्तदेखील ठरविण्यात आला. नागपुरातील रेशीमबाग मैदानात होणाऱ्या या कार्यक्रमापासून सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्यापासून स्वयंसेवक नव्या गणवेशात दिसतील. नवा गणवेश सुरुवातीला संघाकडून तयार करण्यात येईल व केंद्रिभूत पद्धतीने त्याचे वाटप करण्यात येईल, असे ठरले होते. त्यानुसार राजस्थानमधील भिलवाडा येथे ‘टेलर्स’ची ‘टीम’च कामाला लागली होती. नवे गणवेश संघ मुख्यालयात कधी दाखल होतील याबाबत स्वयंसेवकांमध्ये उत्सुकता होती. काही दिवसांअगोदरच तयार झालेले गणवेश राजस्थानमधून दिल्लीत पोहोचले आहेत. दिल्लीहून देशभरात गणवेश पाठविण्यात येणार आहेत. मुख्यालयात हे गणवेश आॅगस्टच्या अखेरच्या आठवड्यापासून उपलब्ध होतील.