शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात आणखी हुंडाबळी, गरोदर पूजाने उचलले टोकाचे पाऊल; महाळुंगे येथील घटना
2
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
3
हुंड्यासाठी तगादा, चारचाकी गाडीची मागणी..! त्रासलेल्या विवाहितेचा टोकाचा निर्णय
4
शनैश्चर जयंती: ३ राशींची साडेसाती, शनिला प्रसन्न करण्याची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा उपासना
5
एक-एक करत 3 गाड्या उडवल्या; पाकिस्तानी सैन्यावर दहशतवादी हल्ला, 32 जवानांचा मृत्यू
6
Narendra Modi : "ऑपरेशन सिंदूर हे फक्त मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र"; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक
7
शनि जयंती: तुमची रास कोणती? राशीनुसार ‘हे’ उपाय करा, शनिच्या अशुभ प्रभावातून मुक्तता मिळवा!
8
Vaishnavi Hagawane Death Case : फरार निलेश चव्हाणसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची लुक आऊट नोटीस जारी
9
अरे व्वा! “निकाल पाहताच मी आणि माझे वडील खूप रडलो”; पिकअप ड्रायव्हरची लेक झाली SDM
10
महाराष्ट्राचे नवे EV धोरण लागू! २०३० पर्यंत या महामार्गांवर टोल फ्री; इमारतींमध्ये चार्जिंग पॉईंट बंधनकारक...
11
जगातल्या 'या' ७ देशांमध्ये राहत नाही एकही भारतीय; तिसऱ्या देशाचं नाव ऐकून व्हाल हैराण
12
ऑपरेशन सिंदूरमधून भारतालाही मिळाला धडा, या बाबींमध्ये कराव्या लागणार सुधारणा, संरक्षण तज्ज्ञांनी केली सूचना
13
वैष्णवी मृत्यू प्रकरण : फरार असताना राजेंद्र अन् सुशील हगवणेंनी वापरलेली गाडी जप्त
14
तुमच्या घरातील सोनं झालं अजून महाग! एकाच दिवसात मोठी वाढ, आजचे दर ऐकून बसेल धक्का!
15
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राचे दहशतवाद्यांशी थेट संबंध होते का? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री होणार आई, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
17
"जे अमेरिकेने सहन केले, ते आम्हीही सहन करत आहोत", शशी थरूर यांनी पाकिस्तानला थेट सुनावले!
18
'ऑपरेशन सिंदूर' करून घरी परतलेल्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू; काकाचं श्राद्ध करतानाच आला हृदयविकाराचा झटका  
19
गुंतवणुकीची सुवर्णसंधी! 'या' आठवड्यात ९ कंपन्यांचे IPO बाजारात, तुमच्यासाठी 'कोणता' ठरणार फायदेशीर?
20
"वाचल्यावर सर्व कळेल..!"; परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३'च्या मेकर्सला दिलं कायदेशीर उत्तर, काय म्हणाले?

पिंजाळ नदीपात्रात वाळूउपसा सुरू

By admin | Updated: October 17, 2016 03:07 IST

पिंजाळ नदीवरील वाळूउपसा बंद करावा, यासाठी पीक व मलवाडा ग्रामस्थांनी मोहीमच हाती घेतली होती.

वाडा : तालुक्यातील पिंजाळ नदीवरील वाळूउपसा बंद करावा, यासाठी पीक व मलवाडा ग्रामस्थांनी मोहीमच हाती घेतली होती. त्याची दखल घेऊन पीक व मलवाडा गावातील हद्दीत रेतीउपसा केला जाणार नाही, यासाठी पीक ग्रामपंचायतीने ठरावदेखील मंजूर केला होता. मात्र, आता पुन्हा मलवाडा गावाच्या हद्दीत वाळूउपसा जोमाने सुरू झाला आहे.याप्रकरणी गावकऱ्यांनी माहिती देऊनसुद्धा वाडा व विक्रमगड या दोन्ही महसूल विभागांतील अधिकारी कारवाईसाठी धजावत नाहीत, हे विशेष! पिंजाळ या बारमाही वाहणाऱ्या नदीवर पीक व मलवाडा गावाच्या हद्दीतून बेसुमार वाळूउपसा केला जात असून ज्यामुळे या नदीपात्राचे मोठे नुकसान होत असून येथील जलसंपदा संकटात आली आहे. या वाळू उपशाविरोधातील तक्रारींची दखल घेऊन पीक -शिलोत्तर ग्रुपग्रामपंचायतीने रेतीउपसा बंदीच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामसभेत ठराव घेतला होता. मात्र, या ठरावाला आता केराची टोपली दाखवतं पुन्हा वाळूतस्करांनी मलवाडा व पीक गावाच्या हद्दीत वाळूउपसा सुरू केला आहे. हद्द कुठलीही असली तरी याचा फटका मात्र जवळपास १ हजार लोकांच्या पिण्याच्या पाण्याला बसणार असल्याने तालुक्याच्या हद्दीचा विचार न करता प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी आहे. (वार्ताहर)>दिवस-रात्र ट्रॅक्टरने उपसापिंजाळ नदीकाठी दिवसा अनेकदा महसूल विभागाच्या लक्षात आणूनसुद्धा कुठलीही कारवाई का झाली नाही? उलट, वाळूतस्कर दिवसा उपसा करून दिवसरात्र ट्रॅक्टर व ट्रकच्या साहाय्याने वाहतूक करतात, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. या प्रकाराची पालघर जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी गंभीर दखल घेऊन पिंजाळ नदी वाळूतस्करांच्या तावडीतंून पूर्णत: मुक्त न केल्यास येत्या काळात या विरोधात उपोषण केले जाईल व तसे लेखी पत्र जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले जाईल, असे ग्रामस्थ प्रवीण पाटील यांनी सांगितले.>वाडा व मलवाडा या हद्दीच्या वादात अडकून आमच्या नदीचे पात्र उद्ध्वस्थ करणाऱ्या वाळूतस्करांना कुणीतरी लगाम घाला. एक हजार लोकांच्या आयुष्याचा प्रश्न असून गांभीर्याने ही नदी वाळूउपसामुक्त करा.- प्रवीण पाटील, पीक ग्रामस्थ>वाडा असो की विक्र मगड, आम्ही एकमेकांशी संवाद ठेवून या वाळूतस्करीवर एकत्रित कारवाई नक्कीच करू. मात्र, विक्र मगडमध्ये आम्ही कठोर भूमिका घेत असल्याने तस्कर अन्यमार्गे वाळूतस्करी करत असल्याचे आमच्या लक्षात आले आहे. -सुरेश सोनावणे, तहसीलदार (विक्र मगड)