शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

सॅण्डहर्स्ट रोड स्थानक होणार इतिहासजमा

By admin | Updated: January 20, 2017 06:33 IST

मध्य रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसटी ते कुर्ला असा पाचवा-सहावा मार्ग बनवणार आहे.

सुशांत मोरे,

मुंबई- मध्य रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसटी ते कुर्ला असा पाचवा-सहावा मार्ग बनवणार आहे. त्यासाठी रेल्वेला अनेक बदल करावे लागणार असून, ऐतिहासिक वास्तूंवरच हातोडा चालवावा लागेल. हे मार्ग बनवताना हार्बर मार्गावरील ब्रिटिशकालिन सॅण्डहर्स्ट रोड स्थानकही जमीनदोस्त केले जाणार आहे. नवे सॅण्डहर्स्ट रोड स्थानक पी. डिमेलो रोडच्या दिशेला उभारले जाईल, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या बदलामुळे हार्बर मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडण्याची शक्यता आहे. सीएसटी ते कुर्ला पाचव्या-सहाव्या मार्गाला रेल्वे बोर्डाने तत्त्वत: मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठीचा खर्च, आरेखन इत्यादीवर अंतिम अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. पाचव्या-सहाव्या मार्गासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने दादर स्थानकात पश्चिमेला दोन नवीन प्लॅटफॉर्म, सायन, करी रोड, चिंचपोकळीसह भायखळा स्थानकातील रचनेतही बदल केले जातील. हार्बरवर कुर्ल्यापासून सीएसटीपर्यंतही बदल होतील.हार्बर मार्ग कुर्ला, डॉकयार्ड रोड येथून पी.डिमेलो रोडमार्गे वळवला जाणार आहे. मेन लाइनवरील सॅण्डहर्स्ट रोड स्थानक मात्र उपलब्ध केले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सॅण्डहर्स्ट रोड स्थानक पी. डिमेलो रोडमार्गे नेतानाच तेथून मशीद स्थानकाला जोडण्यासंबंधीही मध्य रेल्वेकडून नियोजन केले जात आहे. यावर अंतिम निर्णय होणे बाकी असल्याचे सांगण्यात आले. पाचवा-सहावा मार्ग उपलब्ध करण्यासाठी कुर्ला स्थानकातील हार्बर मार्ग एलिव्हेटेड (उन्नत) केला जाणार आहे आणि त्याखालून पाचव्या-सहाव्या मार्गासाठी जागा उपलब्ध केली जाईल. मात्र कुर्ला येथून हार्बरच्या मार्गात बदल करतानाच तो डॉकयार्ड, सॅण्डहर्स्ट रोड व सीएसटीपर्यंत बदल करण्यात येईल. >विल्यम मॅन्सफिल्ड फर्स्ट विस्काउंट सॅण्डहर्स्ट यांच्या नावाने या स्थानकाचे नाव ठेवले आहे. १८९५ ते १९०० या काळात ते मुंबईचे गव्हर्नर होते. हे स्थानक १९२१ साली बांधण्यात आले.