शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

संदीप सावंत यांचा शिवसेनेत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2016 01:22 IST

काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष व राणे समर्थक संदीप सावंत यांनी आज शनिवारी मुंबई येथे मातोश्री येथे शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भगवा झेंडा

चिपळूण : काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष व राणे समर्थक संदीप सावंत यांनी आज शनिवारी मुंबई येथे मातोश्री येथे शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भगवा झेंडा खांद्यावर देत त्यांच्या हातात शिवबंध बांधले. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख विजय कदम, खासदार विनायक राऊत, आमदार सदानंद चव्हाण, रत्नागिरीचे आमदार उदय सामंत जिल्हाप्रमुख सचिन कदम, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम उपस्थित होते. सावंत यांच्याबरोबर काँग्रेसचे माजी नगरसेवक बाळ पड्याळ, काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते व माजी सरपंच प्रभाकर जाधव, कौंढरताम्हाणे ग्रामपंचायतीचे सरपंच चंदन भोबस्कर, उपसरपंच महेंद्र तावडे व सर्व सदस्य, तसेच प्रभाकर जाधव, श्रीकांत पवार, प्रवीण सावंत, एकनाथ माळी, संजिवनी शिंदे, राजेंद्र खेतले, प्रवीण खेडेकर, सुयोग सुर्वे, शिवराम कांबळे, दिलीप आदवडे, विशाल नरळकर, जयश्री पालांडे, रामचंद्र पंडव, महेंद्र तावडे, मनसेचे प्रमोद सकपाळ, सुनील सुर्वे, दीपक खेडेकर, राजेंद्र जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे कैलास चव्हाण, मंगेश चव्हाण, प्रदीप राजेशिर्के, विलास शिंदे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनीही मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश केला. या सर्वांचे स्वागत करून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. शनिवारी दुपारी १ वाजता छोटेखानी पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. प्रमुख पदाधिकाऱ्यांना शिवबंधन बांधून तर काही कार्यकर्त्यांच्या हातात भगवे झेंडे देऊन शिवसेनेत स्वागत करण्यात आले. यावेळी ठाकरे म्हणाले की, ज्या विश्वासाने तुम्ही शिवसेनेत आला आहात तो विश्वास कायम जपला जाईल. तुमचा मान सन्मान राखला जाईल. (प्रतिनिधी)राणेंविरुद्धच्या तक्रारीमुळे चर्चेतमाजी खासदार नीलेश राणे यांनी आपल्याला मारहाण केली असल्याची तक्रार संदीप सावंत यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात केली आहे. त्यामुळे राणे व त्यांच्या सहकाऱ्यांना अटक झाली होती. त्यामुळे सावंत चर्चेत आले. यानंतर सावंत यांनी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. परंतु, शनिवारी त्यांनी सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला.कौंढर ताम्हाणे ग्रामपंचायत शिवसेनेकडेकौंढर ताम्हाणे ग्रामपंचायत माजी सरपंच प्रभाकर जाधव यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. शनिवारी जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने येथील सरपंच चंदन भोबस्कर, उपसरपंच महेंद्र तावडे व सर्व सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने काँग्रेसकडे असलेली ही ग्रामपंचायत आता शिवसेनेकडे गेली आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघातील २५० पेक्षा जास्त कार्यकर्ते शिवसेनेत गेल्याने या मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढली आहे.