शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मावळ गोळीबाराची याचिका निकाली संदीप कर्णिक यांना क्लीन चिट

By admin | Updated: April 24, 2015 01:54 IST

चार वर्षांपूर्वीच्या मावळ गोळीबार प्रकरणात पुणे ग्रामीणचे तत्कालीन पोलीस अधीक्षक व मुंबईचे आताचे परिमंडळ-३चे पोलीस उपायुक्त संदीप कर्णिक यांना खातेनिहाय

मुंबई : चार वर्षांपूर्वीच्या मावळ गोळीबार प्रकरणात पुणे ग्रामीणचे तत्कालीन पोलीस अधीक्षक व मुंबईचे आताचे परिमंडळ-३चे पोलीस उपायुक्त संदीप कर्णिक यांना खातेनिहाय चौकशीत निर्दोष ठरवून त्यांना केवळ समज देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिल्याने कर्णिक यांना ‘क्लीन चिट’ मिळाली.मावळ गोळीबारासाठी पुणे ग्रामीणचे तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप कर्णिक व इतर अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका ईश्वर खंडेलवाल यांनी केली होती. न्या. अभय ओक यांच्या खंडपीठाने सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार देऊन ही याचिका निकाली काढली़ पवना धरणाच्या पाण्यासाठी ८ आॅगस्ट २०११ रोजी शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते़ यावर पोलिसांनी गोळीबार केला़ यात काही शेतकऱ्यांचा बळी गेला़ मात्र या गोळीबाराची आवश्यकता नव्हती़ तत्कालीन पोलीस अधीक्षक कर्णिक यांनी जाणीवपूर्वक गोळीबाराचे आदेश दिले़ यासाठी इतर पोलीस अधिकारीही जबाबदार आहेत़ तसेच कर्णिक यांच्या गोळीने एका महिलेचाही जीव गेला़ तेव्हा त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती़ याचे प्रत्युत्तर सादर करताना राज्य शासनाने या अधिकाऱ्यांवर खातेनिहाय चौकशी केल्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले़ मुळात कर्णिक यांनी जमावाला आटोक्यात आणण्यासाठी हवेत गोळीबार केला होता व यासाठी रबराच्या गोळ्यांचा वापर केला होता़ तरीही कर्णिक यांना समज दिली आहे़ पोलीस अधिकारी अशोक पाटील, यशवंत गवारी व गणेश माने यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात आल्याचेही शासनाने प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले होते.