शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

रेतीघाटांचे बुडाले ११ कोटी

By admin | Updated: May 22, 2014 20:12 IST

अकोला : जिल्ह्यातील रेतीघाटांच्या लिलावात १०१ रेतीघाटांचा लिलाव अद्यापपर्यंत होऊ शकला नाही.

अकोला : जिल्ह्यातील रेतीघाटांच्या लिलावात १०१ रेतीघाटांचा लिलाव अद्यापपर्यंत होऊ शकला नाही. पावसाळा सुरू होण्यास केवळ दहा दिवसांचा कालावधी उरला असल्याच्या स्थितीत या रेतीघाटांचा लिलाव आता होणे शक्य नसल्याने, या रेतीघाटांच्या लिलावातून जिल्हाधिकारी कार्यालयाला अपेक्षित ११ कोटींचे उत्पन्न बुडाले आहे.अकोला जिल्ह्यातील एकूण २५७ रेतीघाटांच्या ऑनलाईन ई-लिलावाची प्रक्रिया गेल्या सप्टेंबरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सुरू करण्यात आली होती. लिलावाच्या पहिल्या फेरीत ७१, दुसर्‍या फेरीत ६९, तिसर्‍या फेरीत १० रेतीघाटांचा आणि चौथ्या फेरीत दोन रेतीघाटांचा लिलाव करण्यात आला. अशाप्रकारे एकूण २५७ पैकी १५२ रेतीघाटांचा लिलाव करण्यात आला. उर्वरित १०४ रेतीघाटांच्या लिलावासाठी शासन निर्णयातील तरतुदीनुसार लिलाव घेण्यास पात्र कंत्राटदारांना ठरावीक दिवशी बोलावून रेतीघाटांचा लिलाव करण्यास विभागीय आयुक्तांमार्फत जिल्हाधिकार्‍यांना प्राधिकृत करण्यात आले. त्यानुसार १०४ रेतीघाटांची निर्धारित किंमत २५ टक्क्यापर्यंत कमी करण्याच्या निर्णयास अधीन राहून, या रेतीघाटांचा जाहीर फेरलिलाव सोमवार, १९ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात आयोजित करण्यात आला होता. मात्र या लिलावात १०४ पैकी केवळ ३ रेतीघाटांचा लिलाव करण्यात आला. त्यामध्ये मूर्तिजापूर तालुक्यातील माटोडा, सालतवाडा आणि तेल्हारा तालुक्यातील वाडी अदमपूर या तीन रेतीघाटांचा समावेश आहे. पाचव्यांदा घेण्यात आलेल्या लिलाव प्रक्रियेत जिल्ह्यातील १०४ रेतीघाटांच्या लिलावातून जिल्हाधिकारी कार्यालयाला १२ कोटींचा महसूल प्राप्त होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र लिलावात तीनच रेतीघाटांचा लिलाव झाला. त्यामधून केवळ ६५ हजार ७५७ रुपयांचा महसूल प्राप्त झाला. उर्वरित १०१ रेतीघाटांचा लिलाव होणे अद्याप बाकी आहे. पावसाळा सुरू होण्यास केवळ दहा दिवसांचा कालावधी उरला असल्याने, या रेतीघाटांचा लिलाव होण्याची आता शक्यता नाही. त्यामुळे या रेतीघाटांच्या लिलावातून जिल्हाधिकारी कार्यालयाला मिळणारे ११ कोटींचे उत्पन्न बुडाल्याचे चित्र आहे.

** लिलाव नाही; उत्खनन जोरात?जिल्ह्यातील १०४ रेतीघाटांचा लिलाव अद्याप होऊ शकला नाही. काही दिवसातच पावसाळा सुरू होत असल्याच्या स्थितीत यावर्षी या रेतीघाटांचा लिलाव होणे आता शक्य नाही. रेतीघाटांचा लिलाव झाला नसला तरी, रेती माफियांकडून या रेतीघाटांमधून रेतीचे अवैध उत्खनन आणि वाहतूक मात्र जोरात सुरू असल्याची चर्चा आहे.