शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’च्या दरपत्रकाची होळी!

By admin | Updated: July 9, 2017 01:02 IST

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी लागणाऱ्या जमिनीसाठी सरकारने शुक्रवारी हेक्टरी लाखो रुपये दर जाहीर केल्यानंतरही शेतकऱ्यांमध्ये तीव्र पडसाद उमटले आहेत.

- लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी लागणाऱ्या जमिनीसाठी सरकारने शुक्रवारी हेक्टरी लाखो रुपये दर जाहीर केल्यानंतरही शेतकऱ्यांमध्ये तीव्र पडसाद उमटले आहेत. शनिवारी शिवडे व नाशिक येथे संतप्त शेतकऱ्यांनी दरपत्रकाची होळी करून निषेध नोंदविला. शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर प्रशासनानेही तातडीने तलाठ्यांची बैठक घेऊन जमिनीच्या थेट खरेदीसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व किसान सभेने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे जाहीर केल्याने नजीकच्या काळात आंदोलन तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सिन्नर व इगतपुरी तालुक्यातील जमीन मालकांसाठी जिल्हा समितीने दर निश्चिती केले असून, थेट खरेदीने जमीन देण्यास संमती देणाऱ्या शेतकऱ्यांना ४८ तासांत पैसे अदा केले जातील. सिन्नर तालुक्यातील शिवडे येथील शेतकऱ्यांनी शासनाला जमीनच द्यायची नाही तर दर कशाला देता, असा सवाल केला. शासनाने जाहीर केलेल्या दराबाबत निर्णय घेण्यासाठी समृद्धी महामार्ग विरोधी शेतकरी संघर्ष समितीची तातडीची बैठक आयटक कार्यालयात अध्यक्ष राजू देसले यांनी घेतली. बैठकीत बागायती, जिरायती असा दर जाहीर करून शासन शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. ४० ते ६० लाख रुपये हेक्टरी दर ही एकत्र कुटुंब पद्धतीच्या गुजराणासाठी पुरेशी नाही. याविरोधात उच्च न्यायालयात ३१ याचिका दाखल झाल्या असून, शासन न्यायालयाच्या नोटिसांना उत्तरे देत नसल्याबद्दल संताप व्यक्त झाला. समृद्धी मार्ग बदलाशासकीय अधिकाऱ्यांनी बागायती जमिनी जिरायती दाखविल्याची तक्रारही शेतकऱ्यांनी केली. समृद्धीचा मार्ग बदलावा, एकही शेतकरी जागा देणार नाही, असा निर्धार बैठकीत करण्यात आला. या प्रकरणी उच्च न्यायालयातही याचिका दाखल आहेत़ या याचिकांचे शासन प्रत्युत्तर सादर करत नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला़