शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

पुरावे आढळले तरच सनातनवर बंदी - देवेंद्र फडणवीस

By admin | Updated: October 5, 2015 12:40 IST

सनातन संस्थेविरोधात पुरावे आढळले तर संस्थेवर बंदी घालण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ५ - कॉ. गोविंद पानसरेंच्या हत्येच्या आरोपाखाली समीर गायकवाड या सनातन संस्थेच्या कार्यकर्त्याला अटक केल्यानंतर सनातनवर बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागलेली असतानाही सरकारने त्यावर अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही.' सनातनविरोधात कोणतेही पुरावे आढळले तरच संस्थेवर बंदी घालण्यात येईल' असे  स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी सनातनवर कारवाई करताना सरकार कोणत्याही दबावाला बळी पडणार नसल्याचे म्हटले आहे. सनातन वर बंदी घालण्यात यावी अशी शिफारस करणारा अहवाल महाराष्ट्र सरकारने २०११ साली सादर केला होता, मात्र तत्कालीन केंद्र सरकारने त्यावर कोणताही निर्णय घेतला नाही, असेही फडवणीस यांनी सांगितले. कॉ. पानसरेंच्या हत्येप्रकरणी सनातनचा कार्यकर्ता समीर गायकवाडला अटक करण्यात आली असून त्याप्रकरणी पोलिस चौकशीचा अहवाल आल्यनंतरच सनातनवरील कारवाई संदर्भात निर्णय घेण्यात येईल. जर संस्थेविरोधात पुरावे आढळला तर सरकार संस्थेविरोधात कारवाई करेल, मात्र तसे न आढळल्यास आम्ही कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.