शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

सनातनच्या तावडेला पोलीस कोठडी

By admin | Updated: June 12, 2016 04:02 IST

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने अटक केलेल्या डॉ. वीरेंद्रसिंह तावडेला शनिवारी संध्याकाळी शिवाजीनगर न्यायालयामध्ये हजर करण्यात आले.

पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने अटक केलेल्या डॉ. वीरेंद्रसिंह तावडेला शनिवारी संध्याकाळी शिवाजीनगर न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. एम. शेख यांनी डॉ. तावडेला १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या दरम्यान, आपल्याला सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दोनदा थापडा मारल्याची तक्रार त्याने न्यायालयाकडे केली. सीबीआयच्या पथकाने तावडेला शुक्रवारी मुंबईच्या कार्यालयामध्ये चौकशीला बोलावल्यानंतर तेथेच अटक केली होती. शनिवारी त्याला पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. सीबीआयचे वकील अ‍ॅड. बी. पी. राजू यांनी तावडे तपासात सहकार्य करीत नसल्याचे न्यायालयाला सांगितले. गोव्यातील मडगावमध्ये २००९ साली झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी सारंग अकोलकर याच्याशी त्याचा ईमेलद्वारे २००८मध्ये संपर्क झालेला आहे. त्याने २००४ साली कोल्हापुरात दाभोलकर यांच्याविरोधात वक्तव्य केल्याचा जबाब कोल्हापूरमधील एका साक्षीदाराने कलम १६४ नुसार सीबीआयला दिल्याचेही न्यायालयाला सांगण्यात आले. दाभोलकरांच्या हत्येमध्ये काळ्या रंगाची मोटारसायकल वापरण्यात आली होती. तशीच दिसणारी मोटारसायकल तावडेकडे असून त्यातील साम्य सिद्ध करण्यासाठी तावडेच्या सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी सीबीआयच्या वकिलांनी केली. यासोबतच तावडे वापरत असलेले तीनही मोबईल गुप्त संभाषणासाठी वापरले जात होते. त्याचाही तपास करायचा असल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने तावडेला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तावडेला न्यायालयात हजर करण्यापूर्वीच न्यायालयामध्ये अंनिस आणि सनातनच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. (प्रतिनिधी)तावडेच्या वकिलांनी आरोप फेटाळलेही अटक केवळ संशयावरून करण्यात आली आहे. जुन्या संभाषणांच्या तारखा विचारून गोंधळ निर्माण करून डॉ. तावडे खोटे बोलत असल्याचे सिद्ध करण्याचा सीबीआयचा प्रयत्न असून ही अटक दाभोलकर कुटुंबीयांच्या दबावामधून झाल्याचा आरोप तावडेचे वकील अ‍ॅड. संजीव पुनावळेकर आणि अ‍ॅड. सुशीलकुमार पिसे यांनी केला. अकोलकर २००९पासून फरार असून या दोघांमध्ये झालेला संवाद हा २००८ सालचा आहे. त्यावेळी डॉ. दाभोलकर होते आणि अकोलकर माध्यमांसमोर सतत बोलत होता. त्यामुळे हत्येशी तावडेचा संबंध जोडणे योग्य नसल्याचे सांगत तावडेच्या घरातून काहीही हस्तगत करण्यात आले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.