शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

‘सनातन’ची ११९ बँक खाती!

By admin | Updated: June 21, 2016 03:22 IST

सनातन संस्थेचे ११९ बँक खाती असून त्यातील काही बँकेच्या खात्यात स्वाक्षरीचे अधिकार मलगौंडा पाटील आणि विनय पवार यांना होते़ त्यांनी फरार असताना त्याचा वापर केला आहे का

पुणे : सनातन संस्थेचे ११९ बँक खाती असून त्यातील काही बँकेच्या खात्यात स्वाक्षरीचे अधिकार मलगौंडा पाटील आणि विनय पवार यांना होते़ त्यांनी फरार असताना त्याचा वापर केला आहे का, याचा तपास सीबीआय करणार असून तशी माहिती आज न्यायालयात देण्यात आली. दरम्यान, ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी हिंदू जनजागरण समितीचा डॉ. वीरेंद्र तावडे याचा ताबा घेण्याची परवानगी पुणे न्यायालयाने सोमवारी कोल्हापूर पोलिसांना दिली. सनातनचा पैसा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ़ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणात वापरण्यात आला आहे़ का, तसेच वीरेंद्र तावडे हा १६९ जणांच्या संपर्कात होता़ त्याने आपल्या दुचाकीचे तपशील रविवारी दिले असून त्याने पुण्यातील ज्या साधकाकडे ही गाडी ठेवली आहे, त्याला ताब्यात घेत असल्याचे सीबीआयच्या वकिलांनी न्यायालायात सांगून तावडेची पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली़ मात्र, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही़ बी़ गुळवे पाटील यांनी सीबीआयची मागणी फेटाळून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली़ तावडे याची सोमवारी पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्याला पुण्यातील जिल्हा न्यायालयात सोमवारी दुपारी हजर करण्यात आले़ कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी तावडे याच्याकडे चौकशी करायची असल्याने त्याला कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात द्यावे, असा कोल्हापूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेला आदेश पोलिसांनी पुण्यातील न्यायालयात सादर केला़ त्याला गुळवे पाटील यांनी मान्यता दिली़ सीबीआयचे वकील राजू यांनी सांगितले की, सनातन संस्थेची ११९ बँक खाती असून काही खात्यांचे व्यवहार करण्याचे अधिकार मलगौडा पाटील, रुद्र पाटील, विनय पवार यांना होते़ हे अधिकार वेळोवेळी बदलत गेले़ सारंग अकोलकर विनय पवार हे फरारी असतानाही या बँक खात्याचा वापर करीत होता का? त्याने त्यातील पैसे विघातक कृत्यासाठी वापरले का, याचा तपास होणार आहे़ (प्रतिनिधी)तावडेकडे आक्षेपार्ह साहित्य!सनातनचे संस्थापक जयंत आठवले यांनी लिहिलेल्या ‘क्षात्रधर्म साधना’ या पुस्तकातील ११ व्या अध्यायात दृष्ट प्रवृतींचा नाश आध्यामिक शक्तीद्वारे करण्याचे लिहिले आहे़ याशिवाय त्यांनी लिहिलेल्या ‘स्पिरिच्युआलिटी’ या पुस्तकात डॉ़ नरेंद्र दाभोलकर, अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि कॉ. पानसरे यांचा उल्लेख असलेले साहित्य तावडे याच्याकडे सापडले आहे़ तावडे याची पत्नी घटस्फोट घेण्याच्या विचारात असल्याची माहिती मिळाली आहे़ ती लंडनहून आज येणार आहे़ तिच्याकडे बँक, पासपोर्ट व इलेक्ट्रॉनिक गॅझेटचा तपास करायचा आहे़ त्यांच्या घराची तपासणी करायची आहे़ यासाठी पोलीस कोठडी हवी असल्याचे सांगितले़आणखी एक साधक रडारवरतावडे हा सहकार्य करीत नसून त्याने आपली दुचाकी पुण्यातील ज्या साधकाला दिली आहे़, त्याची माहिती त्याने रविवारी दिली़ या दुचाकीचा वापर डॉ़ दाभोलकर यांच्या हत्येच्या वेळी केल्याचा संशय आहे़ या साधकाला आज ताब्यात घेऊन चौकशी केली जाणार आहे.गेल्या २ वर्षे १० महिने हा तपास सुरु असून त्यातून काहीही निष्पन्न झालेले नाही़ जयंत आठवले यांनी लिहिलेल्या पुस्तकावर बंदी नसून ते भगवदगीतेवर आधारित आहे़ त्यांना आरोपीची नाही तर सनातन संस्थेची चौकशी करायची आहे़ यापूर्वी सीबीआयला चौकशी करण्याबाबत ९ पत्रे लिहिली आहेत़ त्याचे त्यांनी काहीही उत्तर दिलेले नाही़, असा युक्तीवाद तावडेचे वकील संजीव पुनाळेकर यांनी केला.