विश्वास पाटील, कोल्हापूरज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणातील प्रत्यक्षदर्शी शाळकरी मुलाच्या जीविताबद्दल काळजी व्यक्त करणारे परंतु अप्रत्यक्षरित्या त्याच्या कुटुंबीयांच्या मनात भीती निर्माण होईल, अशा आशयाचे पत्र सनातन संस्थेकडून राजारामपुरी पोलिसांना आले आहे. या पत्रातील मजकूर वाचून ‘सनातन’ला पोलिसांना जागे करायचे आहे की साक्षीदारावर दबाव टाकायचा आहे, अशी शंका उपस्थित होत आहे.‘सनातन’च्यावतीने अॅड. संजीव पुनाळकर यांनी संस्थेच्या लेटरहेडवर कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांच्या पत्त्यावर हे पत्र पाठविले असून ते १२ डिसेंबर २०१५चे आहे. पोलीस निरीक्षकांनी हे पत्र कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकांना ३० डिसेंबरला पाठविले. त्यावर पोलीस अधीक्षकांनी तुम्ही या पत्राबाबत काय कार्यवाही केली, यासंबंधीचा उलट टपाली अहवाल द्यावा, असे कळविले आहे. यासंदर्भात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु फारसा तपशील कुणी दिला नाही.पत्रात काय आहे ?पानसरे हत्याप्रकरणात प्रत्यक्षदर्शी शाळकरी मुलगा साक्षीदार आहे. त्याच्या जीवितास काही बरे-वाईट झाले तर त्याचे खापर ‘सनातन’ संस्थेवर फोडले जाऊ नये यासाठी त्यास पुरेसे पोलीस संरक्षण पुरविण्यात यावे.
‘सनातन’ला त्या प्रत्यक्षदर्शीची काळजी !
By admin | Updated: January 5, 2016 03:09 IST