शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्ग कृषी खात्याचा विषय नाही

By admin | Updated: June 15, 2017 01:30 IST

समृद्धी महामार्ग कृषी खात्याशी संबंधित विषय नसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तो विषय हाताळत असल्याने त्याबद्दल आपल्याला काही बोलायचे नाही, अशा शब्दांत

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : समृद्धी महामार्ग कृषी खात्याशी संबंधित विषय नसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तो विषय हाताळत असल्याने त्याबद्दल आपल्याला काही बोलायचे नाही, अशा शब्दांत राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी या विषयासंबंधीच्या प्रश्नाला बुधवारी बगल दिली.ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात बुधवारी कोकण विभागाची आढावा बैठक फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. कृषी खात्याचे प्रधान सचिव विजय कुमार हेही या वेळी हजर होते. या वेळी कोकण विभागातील खरीप हंगामाचा आणि ‘उन्नत शेती आणि समृद्ध शेतकरी’ या सरकारने सुरू केलेल्या अभियानाचा आढावा घेतला. कर्जमाफीकरिता शेतकरी रस्त्यावर उतरतो. मात्र, परिस्थिती आमूलाग्र बदलली तर एक दिवस असा येईल की, कर्जासाठी शेतकऱ्याला बँकेच्या दारात जावे लागणार नाही, असे फुंडकर म्हणाले. राज्याच्या अन्य भागाप्रमाणेच कोकणातही शेतीकरिता मजुरांचा प्रश्न निर्माण झाल्याने आता यांत्रिकीकरण झाले पाहिजे, असेही फुंडकर म्हणाले. शेती ठिबक सिंचनाखाली आणण्याचा निर्णय सरकारने घेतला असून शेतकऱ्यांना ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत वाढून दिली आहे. सध्या राज्यातून १ लाख अर्ज आले असल्याचे त्यांनी सांगितले. कृषिप्रधान देशात ७० वर्षे लोटल्यानंतरही शेती तोट्यात असून उत्पन्न व खर्च यांचा मेळ बसत नाही. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात व कृषी खात्याला सर्व जण लक्ष्य करतात, याबद्दल फुंडकर यांनी नाराजी प्रकट केली. हवामानाचा अंदाज सांगणारे स्वयंचलित यंत्र बसवण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे पाच गावांत एक केंद्र उभारण्यात येणार असून यामुळे शेतकऱ्यांना तासाभरात हवामानाची माहिती मिळेल. तसेच ग्रामपंचायती डिजिटल झाल्यास शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज घेता येईल, असे फुंडकर म्हणाले.शेतीच्या यांत्रिकीकरणाबाबत चर्चाकोकण विभागात मजुरीचा दर आणि पर्यायाने उत्पादन खर्च कमी करायचा असेल तर, या विभागात मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण वाढले पाहिजे. याबाबत चर्चा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आदी जिल्ह्यांबाबत या वेळी आढावा घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.