शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

सत्तातर मोदीलाट कायम

By admin | Updated: October 20, 2014 06:29 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाला १२२ जागा मिळाल्या आहेत. स्वतंत्र लढूनदेखील बहुमताच्या जवळपास जाणारे यश भाजपाला मिळवून देण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सिंहाचा वाटा राहिला.

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाला १२२ जागा मिळाल्या आहेत. स्वतंत्र लढूनदेखील बहुमताच्या जवळपास जाणारे यश भाजपाला मिळवून देण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सिंहाचा वाटा राहिला. त्यांनी केलेल्या एकहाती प्रचाराचे हे यश आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपाला ४२ जागांवर यश मिळाले होते. यामुळे विधानसभा निवडणुकीत किमान २४० जागांवर आघाडी मिळेल, असा विश्वास राज्यातील भाजपा नेत्यांना होता. त्याकरिता शिवसेनेबरोबर असलेली २५ वर्षांची युती भाजपाने तोडली. यापूर्वी भाजपा ११९, तर शिवसेना १६९ जागा लढत होती. युतीच्या जागावाटपात भाजपाला १३५ पेक्षाही कमी जागा मिळत असल्याचे दिसताच स्वबळावर लढण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय योग्यच होता, हे निकालाने दाखवून दिले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर इतर पक्षांतून आयात केलेल्या नेत्यांवरून खूप टीका झाली. पण निवडून आलेल्या १२२ जणांमध्ये ३०हून अधिक आयारामांचा समावेश आहे. त्यामुळे तो निर्णयही भाजपाच्या पथ्यावरच पडला. खरं म्हणजे गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे जनाधार असलेल्या नेत्याची पोकळी भाजपामध्ये निर्माण झाली होती. विशेषत: ओबीसी समाजातील नेतृत्व नव्हते. पण पंकजा मुंडे यांना संघर्ष यात्रेवर पाठवून ती पोकळी भरून काढण्याचा यशस्वी प्रयत्न केला. विदर्भात नितीन गडकरी आणि सुधीर मुनगंटीवर, खान्देशात एकनाथ खडसे, प. महाराष्ट्रात राजू शेट्टी, महादेव जानकर आदी मित्रपक्षांचे नेते, मराठवाड्यात पंकजा, मुंबईत विनोद तावडे अशी तगडी टीम प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढली. मुख्यमंत्रिपदासाठी कोणताही चेहरा पुढे न करता सामूहिक नेतृत्व उभे केल्याने राज्यात भाजपाच्या जागा वाढल्या. २००९ ला मिळालेल्या ४६ जागांवरून १२२ जागांवर भाजपाला मजल मारता आली. त्यांचा मित्रपक्ष राष्ट्रीय समाज पक्षाला एक जागा मिळाली.प. महाराष्ट्रात राष्ट्रवादीला पराभूत करण्याकरिता भाजपाने वेचून वेचून बिभीषण गोळा केले होते. पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी उभी केलेली प्रचार यंत्रणा आणि मोदींच्या २७ सभांचा झंझावात असे समीकरण जुळून आल्याने भाजपाला यश प्राप्त झाले. भाजपाने जिंकलेल्या जागा पाहता, गेल्या वेळपेक्षा किमान ७५हून अधिक जागांची वाढ झाली आहे. बहुमताचा जादूई आकडा गाठता आला नाही, तरी सरकार स्थापन करण्याएवढे संख्याबळ असल्याने राज्यपाल भाजपालाच पाचारण करणार, हे उघड आहे. पाठिंबा कोणाचा, राष्ट्रवादीचा की शिवसेनेचा, एवढाच काय तो प्रश्न आहे!