कोल्हापूर : ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला संशयित, सनातन संस्थेचा साधक समीर विष्णू गायकवाड याच्याकडे बोट करून ‘हाच तो मारेकरी’ असल्याचे प्रत्यक्षदर्शी १४ वर्षांच्या शाळकरी मुलाने पोलिसांना सांगितले. संशयित आरोपीची ओळख परेड तहसीलदार डॉ. योगेश खरमाटे यांच्यासमोर बुधवारी कळंबा मध्यवर्ती कारागृहात सकाळी अकरा वाजता झाली.पानसरे यांच्या पत्नी उमा पानसरे, त्यांची मोलकरीण, शेजारी राहणारी व्यक्ती व शाळकरी मुलगा अशा चौघांसमोर समीरसह बारा संशयितांना समोर उभे केले होते. यावेळी उमा पानसरे, मोलकरीण व शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने येथे तो माणूस उपस्थित नाही, असे सांगितले; चौदा वर्षांच्या मुलाने मात्र बारा संशयितांच्या चेहऱ्यावर नजर फिरवित समीरवर ती रोखली आणि त्याच्या दिशेने बोट करून ‘हाच तो मारेकरी’ म्हणून ओळखले अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. पानसरे हत्याप्रकरणी समीर गायकवाड याला दि. १६ सप्टेंबरला कोल्हापूर पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्याला १२ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या कालावधीत पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी करण्याचा प्रयत्न केला. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याची कळंबा कारागृहात रवानगी करण्यात आली. दरम्यान, पानसरे हत्येप्रकरणी अटक केलेल्या संशयित आरोपीची घटनास्थळावरील प्रत्यक्ष साक्षीदारांच्यासमोर ओळख परेड घेण्यास परवानगी द्यावी, असा विनंती अर्ज तपासी अधिकारी एस. चैतन्या यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. डी. डांगे यांच्याकडे केला होता. त्यास न्यायमूर्ती डांगे यांनी परवानगी देत करवीरचे तहसीलदार डॉ. योगेश खरमाटे यांच्यासमोर ओळख परेड घेण्यात यावी, असे आदेश पोलिसांना देऊन ओळख परेडसाठी हजर राहण्यासाठी खरमाटे यांनाही पत्र पाठविले होते. समीरच्या न्यायालयीन कोठडीची मुदत शुक्रवारी (दि. ९) संपत आहे. या दिवशी त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. यावेळी त्याच्या वाढीव न्यायालयीन कोठडीसह ब्रेन मॅपिंग चाचणीचा निर्णय होणार आहे. रुद्र पाटीलबाबत काय कारवाई केली? : हायकोर्टाची विचारणागोवा बॉम्बस्फोटप्रकरणी सहा वर्षे फरार असलेला आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित असलेला रुद्र पाटील याला पकडण्यासाठी आतापर्यंत काय पावले उचललीत, असा सवाल करत उच्च न्यायालयाने बुधवारी विशेष तपास पथकाला (एसआयटीला) २० आॅक्टोबरपर्यंत नव्याने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. / वृत्त ८1अशी झाली ओळख परेडओळख परेड घेण्यासाठी राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमृत देशमुख हे बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास प्रत्यक्षदर्शी साक्षीदार उमा पानसरे, त्यांची मोलकरीण, शेजारी राहणारी व्यक्ती व शाळकरी मुलगा अशा चौघाजणांना घेऊन कळंबा मध्यवर्ती कारागृहात गेले.2 त्यांच्यासोबत मेघा पानसरे, कॉ. दिलीप पवार, कॉ. रघुनाथ कांबळे हे देखील होते. पाठोपाठ करवीरचे तहसीलदार डॉ. खरमाटे कारागृहात आले. काही वेळ कारागृहाबाहेर थांबवून कारागृह प्रशासनाच्या परवानगीनंतर सर्वांना आतमध्ये प्रवेश देण्यात आला. ३यावेळी चौघा साक्षीदारांच्या समोर एका रांगेत वेगवेगळ्या चेहऱ्याच्या बारा संशयितांना उभे केले होते. 4पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांनी साक्षीदार उमा पानसरे यांना तुम्ही पाहिलेला मारेकरी यापैकी कोण आहे? अशी विचारणा केली. त्यावर सर्वांकडे नरज टाकून त्यांनी ‘तो माणूस इथे नाही’ असे त्यांनी सांगितले. त्यानंतर मोलकरीण व शेजारी राहणाऱ्या व्यक्तीलाही विचारले. दोघांनीही येथे मारेकरी उपस्थित नसल्याचे सांगितले. 5त्यानंतर शाळकरी मुलाला विचारले. त्याने बारा संशयितांच्या चेहऱ्याकडे नजर फिरवत समीरवर रोखली. काही क्षणातच त्याने हाताने समीरकडे बोट दाखवत ‘हाच तो मारेकरी’ मी पाहीलं होतं त्याला, असे सांगितले. त्यानंतर सर्व संशयितांना कारागृहातील बॅरेकमध्ये पाठविले. उमा पानसरे यांच्यासह साक्षीदारांना पोलीस बंदोबस्तात पुन्हा त्यांच्या घरी सोडण्यात आले. या संपूर्ण ओळख परेडचा अहवाल तहसीलदार डॉ. खरमाटे यांनी बंद लखोट्यातून न्यायालयाकडे सादर केला. ‘लोकमत’मध्ये सर्वप्रथम वृत्तहल्लेखोर कोण असावेत, याचा अंदाज बांधत असताना त्यांना कोणी पाहिले का? हे पाहणे पोलिसांसाठी महत्त्वाचे होते. त्यासाठी पोलिसांनी त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांकडे चौकशी केली परंतु हल्लेखोरांना पाहिल्याचे कोणीच सांगत नव्हते. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी परिसरातील लहान मुलांकडे चौकशी केली असता चौदा वर्षांच्या मुलाने आपण हल्लेखोरांना पाहिल्याचे सांगितले होते. देशमुख यांनी त्याला विश्वासात घेऊन घटनास्थळी आणले. याठिकाणी त्याच्याकडून हल्लेखोरांनी हल्ला कसा केला, याची माहिती घेतली तेथून देशमुख ‘त्या’ मुलाला पुन्हा आजूबाजूला घेऊन गेले. त्यानंतर त्याला पोलीस जीपमध्ये बसवून सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास देशमुख यांनी त्याचा लेखी जबाब घेतला. त्यानंतर त्या मुलाला त्याच्या वडिलांसोबत घरी पाठविले. हे वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. ‘त्या’ मुलाने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी हल्लेखोरांचे रेखाचित्र बनविले होते.
समीरच मारेकरी!
By admin | Updated: October 8, 2015 00:28 IST