शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
2
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
3
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
4
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
5
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
6
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
7
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
8
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
9
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
10
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
12
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
13
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
14
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
15
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
16
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
17
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
18
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
19
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
20
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ

समीरवर ३९२ पानी आरोपपत्र

By admin | Updated: December 15, 2015 02:42 IST

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. डी. डांगे यांच्या न्यायालयात सोमवारी सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाडवर ३९२ पानांचे दोषारोपपत्र

कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. डी. डांगे यांच्या न्यायालयात सोमवारी सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाडवर ३९२ पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. त्यात ७७ साक्षीदारांचे जबाब, समीरच्या दोन मैत्रिणी, एक मित्र, त्याने मोबाइलवरून इतरांना केलेल्या कॉलच्या संभाषणाचा प्रयोगशाळेने दिलेला अहवाल, तसेच त्याने ‘क्षात्रधर्म साधना’ हे पुस्तक वाचून त्यातील संदर्भाद्वारे पानसरे यांच्या हत्येचा कट रचला आदी बाबींचा समावेश आहे. समीरवर खून, खुनाचा प्रयत्न, हत्येचा कट रचणे आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. समीरला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.पानसरे हत्या प्रकरणातील कागदपत्रे, अन्य पुरावे गोळा करण्यासाठी तपास अधिकाऱ्यांना न्यायालयाने परवानगी दिली. गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नी उमा यांच्यावर सागरमाळ येथे १६ फेबु्रवारी २०१५ ला गोळीबार झाला होता. त्यात पानसरे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर १६ सप्टेंबर २०१५ रोजी सांगलीतील समीर गायकवाड (२९) यास विशेष तपास यंत्रणेने (एसआयटी) अटक केली. एसआयटीचे प्रमुख संजयकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस अधीक्षक चैतन्या एस. यांनी समीरचे दोषारोपपत्र तयार केले. (प्रतिनिधी)असे आहे दोषारोपपत्रसंशयित समीर दुचाकीवरून गोळ््या झाडून घटनास्थळावरून पळून जाताना, त्याच परिसरातील एका शाळकरी मुलाने पाहिले.समीरचे त्याच्या मैत्रिणी ज्योती कांबळे (रा.भांडुप, मुंबई) व अंजली झरकर (रा. गजानननगर नाळवडी नाका, ता. जि. बीड. सध्या रा. देवद आश्रम, पनवेल) व मित्र सुमित खामणकर (रा. वणी, जि.यवतमाळ) यांच्याबरोबरचे मोबाइलवरील संभाषण. त्यात ‘ज्याला मारायचे आहे, त्याला मारले आहे, आता कोणी शत्रू नाही.. मी जाऊन येतो, नाशिकच्या कुंभमेळ््याला, लई पापं केली आहेत, डुबक्या मारून येतो, लय नाही, फक्त दोनच केली आहेत,’ असे संभाषण त्याने २७ जून २०१५ ला दोन वेळा व २१ जुलै २०१५ ला केले होते, असा उल्लेख.‘पानसरे झाला, आता नितीन वागळेचा करू का..’ असे तो ज्योती कांबळे हिच्याबरोबर १९ जून २०१५ ला मोबाइलवर बोलल्याचे दोषारोपपत्रात नमूद आहे.मेघा पानसरेंची विनंतीज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील, पानसरे यांची स्नुषा मेघा, नातू मल्हार, दिलीप पवार आदींनी जिल्हा पोलीसप्रमुख प्रदीप देशपांडे यांची भेट घेऊन, दोषारोपपत्रात त्रुटी राहू नयेत, याची दक्षता घेण्याची पोलिसांना विनंती केली.