शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
2
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
3
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
4
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
5
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
6
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
7
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
8
विधानभवनच्या गेटवर आग; सहा मिनिटांत आटोक्यात
9
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
10
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
11
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
12
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
13
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
14
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
15
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
16
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
17
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
18
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
19
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
20
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू

समीरच्या सिमकार्डांवरून झाले अनेक प्रश्न उपस्थित

By admin | Updated: September 27, 2015 05:37 IST

सिमकार्ड ही ई-डायरी असून सिमकार्डसह मोबाइल कोणी दुरुस्तीला देत नाही. समीर गायकवाडला ३१ मोबाइल सिमकार्डसह दुरुस्तीला दिले, असे त्यांचे म्हणणे आहे

कोल्हापूर : सिमकार्ड ही ई-डायरी असून सिमकार्डसह मोबाइल कोणी दुरुस्तीला देत नाही. समीर गायकवाडला ३१ मोबाइल सिमकार्डसह दुरुस्तीला दिले, असे त्यांचे म्हणणे आहे; मग या सीमकार्डद्वारे ३१ विचार पुरविणारे कोण आहेत, असा सवाल सरकारी वकिलांनी शनिवारी उपस्थित केला.ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील संशयित ‘सनातन’ संस्थेचा साधक समीर विष्णू गायकवाड याच्या घरावर टाकलेल्या छाप्यात सिमकार्डांसह मोबाइल सापडले होते. त्याची कोठडीची मुदत संपल्यामुळे त्याला प्रथम वर्ग न्यायाधीश वैशाली व्ही. पाटील यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. पनवेलमधून सांगलीत मोबाइल दुरस्तीला येतात. हे अंतर किती आहे? पनवेलमध्ये हे मोबाइल दुरुस्त होत नाहीत का? समीरचे सांगलीतील मोबाइल दुरुस्तीचे दुकान २००८ पासून बंद असताना मोबाइल दुरुस्तीला आले कसे, असा प्रश्नांचा भडिमार सरकारी वकिलांनी केला.तर, यावर युक्तिवाद करताना, पोलिसांनी समीर गायकवाड याला केवळ आवाजाच्या नमुन्यावरून अटक केली आहे. आतापर्यंत १६४ साक्षीदार तपासले, हाती कोणताच धागादोरा नाही, असा दावा बचाव पक्षाच्या वकिलांनी केला. समीरच्या आवाजाचे नमुने पुण्याच्या शाळेतून प्राप्त झाले आहेत. ते त्याचेच आहेत; परंतु त्यामध्ये त्याने पानसरे यांचा खून केल्याचा कोठेच उल्लेख नाही. ‘मी लय पाप केलीत. समीर रुद्रला फक्त मोबाईलच्या दुकानामुळे ओळखतो. याव्यतिरिक्त त्याचा कसलाही संबध नाही. तसेच त्याचा गेली आठ वर्षे संपर्कही नाही, असे सांगतानाच मडगाव बॉम्बस्फोटामध्ये १२४ साक्षीदार तपासले. त्यामध्ये रुद्रगौडा पाटीलचे कुठेही नाव नाही. पोलिसांकडून जी काही माहिती सांगितली जातेय त्यामध्ये तथ्य नाही, असेही वकील म्हणाले.--------प्रत्येक खटल्यावेळी नवीन न्यायाधीशसंशयित समीर गायकवाड याला पोलिसांनी अटक करून पहिल्यांदा कसबा बावडा येथील प्रथम वर्ग न्यायाधीश (क्रमांक ६) आर. डी. डांगे यांच्यासमोर हजर केले. यावेळी त्याला आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली. त्यानंतर दुसऱ्यांदा त्याला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अपर्णा कुमार जैनापुरे यांच्यासमोर हजर केले. त्यानंतर तिसऱ्यांदा पोलिसांनी न्यायाधीश वैशाली पाटील यांच्यासमोर हजर केले. त्यांनी त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली. एकाच न्यायालयात तीन वेळी नवीन न्यायाधीश बदलाची चर्चा न्यायालय परिसरात होती. --प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधाततक्रार करणारप्रकाश आंबेडकर यांनी सनातनच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध करीत त्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार करण्याचा पवित्रा संस्थेने घेतलेला आहे. कॉ. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातनला दोषी ठरविताना त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी नक्षलवाद पुरेसा असल्याचे वक्तव्य आंबेडकर यांनी एका चर्चेत केले होते. या प्रकरणी सरकारने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी केली आहे. -----‘सनातन’च्या आठवलेंवर गुन्हा नोंदवा : लेखनातून हिंसेचे समर्थन करणारे ‘सनातन प्रभात’चे डॉ़ जयंत आठवले, त्यांचे कार्यकारी मंडळ, समर्थन करणारे नेते आणि सल्लागारांवर देशद्रोहाचा गुन्हा सरकारने दाखल करावा, सनातन प्रभात आणि त्यांच्या समविचारी संघटनाकडून हिंसक कारवायांसाठी होणारा बहुजनांच्या मुला-मुलींचा वापर रोखावा, हे ठराव जाहीर प्रतिरोध परिषदेत शनिवारी मंजूर करण्यात आले़ त्यांना २६ संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मंजुरी दिली़ विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे महाराष्ट्र अध्यक्ष पार्थ पोळके यांनी मशाल पेटवून परिषदेचे उद्घाटन केले. ‘दहशतवादी कारवायांसाठी डोकी सनातनी़़़ पोरं-पोरी मात्र बहुजनांची...’ आम्ही हे आता चालू देणार नाही, असे कार्यकर्त्यांनी सांगितले.---------पुरोगामी कोल्हापूरने दखल घेतली गायकवाड याच्या बाजूने ३१ वकिलांनी वकीलपत्र दाखल करून दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पुरोगामी कोल्हापूरने याची दखल स्वत:हून घेतली. पानसरे कुटुंबीयांच्या वतीने सुमारे ३०० वकिलांनी वकीलपत्र दाखल केले. त्याबद्दल स्मिता पानसरे, मेघा पानसरे, मल्हार पानसरे, कॉ. दिलीप पवार, सतीशचंद्र कांबळे, रवी गायकवाड, बन्सी सातपुते यांनी सर्व वकिलांचे आभार मानले.-------श्रद्धा पवारची चौकशीसमीरची मैत्रीण श्रद्धा पवारला पुन्हा चौकशीसाठी ताब्यात घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. शनिवारी पोलीस कोठडी मिळाल्यानंतर दुपारनंतर रात्री उशिरापर्यंत समीरचीही चौकशी सुरू होती. -------(प्रतिनिधी)